
घरफोडी
06322
कबनूर : येथील व्यापाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटे फोडून प्रापंचिक साहित्याची नासधूस केली.
...
कबनूर येथे बंद घराचे
कुलूप तोडून १ लाखाची चोरी
इचलकरंजी, ता.१७ : कबनूर (ता. हातकणंगले) येथील व्यापाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा कपाटे फोडली. चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तनगर, कबनूर येथे मोहिद्दीन बापुलाल मारूफ (वय ६३) हे कुटुंबासह राहतात. ते १३ मे ला कर्नाटकातील कुडची येथे विवाह समारंभासाठी तर त्यांचे कुटुंबिय पुणे येथे गेले होते. या कालावधीत त्यांचे घर कुलूपबंद होते. मंगळवारी (ता.१६) ते घरी परतले. यावेळी घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता प्रापंचिक साहित्याची नासधूस तर तिन्ही खोलीतील सहा तिजोऱ्या फोडल्याचे आढळून आले. चोरट्यांनी सोन्याची अंगठी, कानातील डुल आणि रोख ७० हजार असा १ लाख ५ हजाराच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी मारुफ यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
----------
घरफोडीच्या पद्धतीत साम्य
काही दिवसांपूर्वी जवाहरनगर भागात घरफोडीचे प्रकार घडले होते. येथील घरफोड्या आणि कबनूर येथे झालेली घरफोडी यांच्यामध्ये तंतोतंत साम्य पोलिस तपासात समोर आले आहे. चोरट्यांची हालचाल, चोरीची पद्धत आणि पुरावा मागे न सोडण्याची शक्कल मिळतीजुळती असल्याचे पोलिसांनी सांगितले.