उन्हामुळे पालेभाज्यांची आवक घटली

उन्हामुळे पालेभाज्यांची आवक घटली

06329
इचलकरंजी : १)कोथिंबीरची आवक बाजारात कमी होत आहे.
06328
२) पाणीदार असलेल्या वॉटर ॲपल फळाला पसंती अधिक आहे.

उन्हामुळे पालेभाज्यांची आवक घटली
खाद्यतेलाचे दर प्रति किलो पाच ते दहा रुपयांनी उतरले; लग्नसराईने फुलबाजाराची उसळी
इचलकरंजी, ता. १८ : घटलेल्या पालेभाज्यांच्या आवकेला उन्हाचा चटका असह्य होत आहे. या आठवड्यात पालेभाज्यांची आवक घसरली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर ग्राहकांच्या हाताबाहेर जाताना दिसत आहे. सर्वाधिक झळ कोथिंबीरची बसत असून स्थानिक आणि कर्नाटक भागातून होणारी आवक ठप्प झाली आहे. तुटक तुटक होणाऱ्या परजिल्ह्यातील आवकेवर कोथिंबीरचा बाजार सुरू आहे. दुसरीकडे सध्याची एकूणच परिस्थिती फळभाज्यांसाठी लाभदायक ठरत आहे.
आले अद्याप आवाक्याबाहेर असून लिंबुचे दर गार पडले आहेत. महागाईने कळस घातलेल्या खाद्यतेलाचे दरही आणखी उतरतच आहेत. या आठवड्यात पुन्हा खाद्यतेलाच्या प्रति किलो दरात पाच ते दहा रुपयांची घट झाली आहे. लग्नसराईच्या तेजीत फुलबाजाराने उसळी घेतल्याचे चित्र आहे. निम्म्याने उतरलेले निशिगंधाचे भाव त्याच पटीत पुन्हा वाढले आहेत. झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांच्या दरातही वाढ झाली आहे. फळबाजारात कलिंगडचा हंगाम यंदा लवकरच आटोपताना दिसत आहे. आवक फारच घटल्याने एका कलिंगड नगाला १०० रुपये मोजावे लागत आहेत. भरु उन्हात वॉटर ॲपल (जॅम) हे कोकणी फळ लक्ष वेधून घेत आहे. आंब्याचा भाव उतरला नसून देशाच्या कानाकोपऱ्यातून मिळेल तो आंबा विक्रीसाठी शहरात दिसत आहे.
प्रति किलो रूपये भाजीपाला : टोमॅटो- २० ते २५, दोडका- ५० ते ६०, वांगी- २५ ते ३५, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -४०ते ५०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१२ ते १५, बटाटा- २५ ते ३०, कांदा -१८ ते २०, पांढरा कांदा-२०ते २५, लसूण- ८० ते १००, आले- २०० ते २२०, लिंबू- १५०- ४०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- १४० ते १५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा - ७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ६० ते ८०, रताळे - ३० ते ४०, दुधी -३० ते ४०, कोथिंबीर-३० ते ३५, मेथी - २० ते २५, अन्य पालेभाज्या १५ ते २० रूपये, शेवगा ३ ते ५ रूपये नग.
- - --- - - -
फुले : झेंडू -६० ते ७०, निशिगंध- १६०, गुलाब - २००-२५०, गलांडा- ७० ते ८०, शेवंती-१२० ते १५०.
- - - -- - -
फळे : सफरचंद- १८० ते २००, संत्री - १०० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १०० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरु-३० ते १००, खजूर - १५० ते २००, द्राक्षे - ६० ते १००, पपई- ३० ते ५०, खजूर-१२० ते १६०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ४० ते ५० डझन, देशी केळी - ८० ते ९० डझन, किवी -१०० ते १२०, स्ट्रॉबेरी-५० ते ६० (लहान बॉक्स), चिंच-१०० ते १४०, अंजीर - २००, प्रतिनग टरबूज ५० ते ६०.
-- -
खाद्यतेल : सरकी -१०५ ते ११०, शेंगतेल - १६० ते १७०, सोयाबीन -१०५ ते ११०, पामतेल -१०५ ते ११०, सूर्यफूल -११० ते ११५.
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३५ ते ५५, बार्शी शाळू- ४०ते ५३, गहू- ३० ते ३८, हरभराडाळ -६४ ते ६६, तुरडाळ- १२५ ते १३२, मुगडाळ- १०५ ते ११८, मसूरडाळ - ७८, उडीदडाळ- १०० ते ११०, हरभरा- ५५ ते ५८, मूग- ९४ ते १०५, मटकी- १२५ ते १३०, मसुर- ७०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ७५ ते ८३ , हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.
- - - - - - - - - - - -
देशी केळींचा तुटवडा
केळीची आवक पूर्वपपदावर येत असून देशी केळींची आवक विस्कटली आहे. बाजारात देशी केळींचा फार तुटवडा जाणवत आहे. नेहमीच्या विक्रेत्याकडे देशी केळी उपलब्ध होईना झाली आहेत. डझनाचे भाव शेकड्यात गेले आहेत. बाजारात ग्राहक आणि विक्रेतेही देशी केळीला महाग होऊन बसले आहेत.

-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com