साजणीत रथोत्सवाने त्रैलोक्य महोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साजणीत रथोत्सवाने त्रैलोक्य महोत्सवाची सांगता
साजणीत रथोत्सवाने त्रैलोक्य महोत्सवाची सांगता

साजणीत रथोत्सवाने त्रैलोक्य महोत्सवाची सांगता

sakal_logo
By

06331
साजणी ः येथे त्रैलोक्य विधानामध्ये रथोत्सव मिरवणूक काढली.
------------
साजणीत रथोत्सवाने त्रैलोक्य महोत्सवाची सांगता
रुई, ता. १८ : साजणी येथील श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सवाची सांगता भव्य रथोत्सवाने झाली.
रथोत्सवामध्ये मुख्य चांदीच्या रथासह सहा रथ, दोन बँड, एक बेंजो व लेझर शो अशी मिरवणूक काढली. रथोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो श्रावक श्रविका उपस्थित होते. मुख्य मंडपापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. मुख्य रथात बसण्याचा मान सुरेश मोघे यांना सहकुटुंब मिळाला. दुसऱ्या रथात बसण्याचा मान अरुण बाळासाहेब हेरवाडे कुटुंबाला मिळाला. मिरवणुकीमध्ये यजमान सुरेंद्र बापू रायनाडे तसेच सहाय्यक इंद्रवर्ग सहभागी झाले होते.
दरम्यान सकाळी नित्यपूजा, मंगलकुंभ आणून गळतगे परिवारांनी जिनेंद्र भगवंताचा पंचामृत अभिषेक केला. दुपारी कुंथूसागर महाराज, आचार्य निश्चियसागर महाराज यांची पादपूजा वीर सेवा दल, वीर महिला मंडळ व महोत्सव समितीमार्फत केली. कुंथूसागर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. महोत्सवामध्ये प्रतिष्ठाचार्य डॉ. सम्मेद उपाध्ये यांना ‘प्रतिष्ठा मार्तंड’ ही पदवी तसेच संगीतकार सोनाली देसाई चौगुले यांना ‘संगीतरत्न’ ही पदवी साजणी दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ व श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सव समितीमार्फत प्रदान केली.