Sat, Sept 30, 2023

अपघात मयत
अपघात मयत
Published on : 18 May 2023, 5:05 am
इचलकरंजीतील अपघातामधील जखमीचा मृत्यू
इचलकरंजी : कॅबसन हॉटेलजवळ झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागेश दौलतराव काळे (वय ४३, रा. कारंडे मळा, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (ता. १७) रात्री झाला. काळे हे स्टेशन रोडवरील कॅबसन हॉटेलजवळून पायी निघाले होते. या वेळी त्यांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याकडेला पडले. हे नागरिकांना निदर्शनास येताच जीवनमुक्ती संघटनेच्या रुग्णवाहिकेशी संर्पक साधला. त्यांनी जखमी काळे यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून आयजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने प्राथमिक उपचारानंतर १०८ रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.