महिलेला लुटले

महिलेला लुटले

इचलकरंजीत हिसडा मारून मंगळसूत्र पळविले

इचलकरंजी : शहरात महिलांच्या लुटीच्या घटना थांबल्या नसून अनेक घटना उघडकीस आल्यानंतर महिला तक्रारीसाठी पुढे येत आहेत. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात गेल्या दोन दिवसांत आज दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या‍ महिलेचे तोंड दाबून गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (ता.१७) पहाटे गणेशनगरमधील बालाजी मंदिराजवळ रोडवर घडली.चोरट्यांनी त्याचदिवशी अशीच आणखी चोरी केली होती. विमल पांडुरंग दोरोगडे (वय ५८, रा. गणेशनगर, गल्ली नं. ९) या बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील बालाजी मंदिरजवळील रोडवरून फिरायला जात होत्या. अचानक एका अज्ञाताने पाठीमागून येऊन त्यांचे तोंड दाबले. गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून मोटारसायकलवरून त्याने यड्रावच्या दिशेने पलायन केले. याप्रकरणी विमल दोरोगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com