दोन गट हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन गट हल्ला
दोन गट हल्ला

दोन गट हल्ला

sakal_logo
By

इचलकरंजीत दोन गटांत हाणामारी

इचलकरंजी,ता.१९ : गावभाग पोलिस ठाण्यानजीक दोन गट एकमेकांत भिडले. या वादात रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांवर धारदार शस्त्राने वार झाले. जुन्या वादाच्या धुसपुशीतून झालेल्या या हल्ल्यात अविनाश विजय चव्हाण, आकाश तानाजी आवळे (रा. इचलकरंजी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गावभाग पोलिस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण बनले होते. या प्रकरणातील जखमी आणि हल्लेखोरांचीही माहिती मिळत नसल्याने पोलीस चक्रावून गेल्याचे दिसून आले.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आवळे गल्ली परिसरात तरुणांचा मोठा जमाव एकत्र आला. यातील काहींमध्ये पूर्ववैमनस्यातून सुरू असणाऱ्या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले. एकमेकांवर धारदार शस्त्रे, दगड, विटांनी हल्ला चढवला.या हल्ल्यात दोघे जखमी झाले.अविनाश चव्हाण याच्या डोक्यात, पोटावर, मांडीवर वार झाले आहेत तर अक्षय आवळे याच्या अंगावर सपासप वार झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. जखमी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. हल्लेखोर पसार झाले. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिस दाखल झाले. रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या जखमींसह हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत होते. दरम्यान अनेक वर्षानंतर दोन गटात झालेल्या या वादानंतर शहरात तणावाचे वातावरण बनले. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
--------
आयजीएम रुग्णालयात बाचाबाची

हल्ल्यात दोन्ही गटाकडील जखमी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी एकाला आयजीएम रुग्णालय उपचारासाठी आणल्यानंतर दोन्ही गटात वाद पुन्हा उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. बाचाबाची करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या ठिकाणी त्वरित पोलिसांनी हस्तक्षेप करत तणाव निवळला.