भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या गझल सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या गझल सादर
भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या गझल सादर

भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या गझल सादर

sakal_logo
By

06343
इचलकरंजी : मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत सोमवारी नवव्या दिवशी गझलरंग हा मराठी गझलचा दर्जेदार मुशायरा झाला.
---------
लोगो ः मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला
--------
भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या गझल सादर
महाराष्ट्राच्या विविध भागातील सहा कवींच्या गझलरंग कार्यक्रमास रसिकांची दाद
इचलकरंजी, ता.२३ : येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात विविध भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या आशयपूर्ण व दर्जेदार गझलांचे सादरीकरण सुरेश भट गझल मंच पुणे या संस्थेच्या कवींनी केले.
महाराष्ट्राच्या विविध भागातील सहा कवींच्या गझलरंग कार्यक्रमाचे उत्तम आणि खुमासदार निवेदन शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. भालचंद्र भुतकर (सातारा ), रुपेंद्र कदम (सांगली), ज्योत्स्ना राजपूत (जळगाव), राजवर्धन कदम (पुरंदर), अमित वाघ (अकोला) आणि राधा भावे ( गोवा) या दमदार गझलकार, कवी, कवयित्रींनी दर्जेदार रचना सादर करून रसिकांची दाद मिळविली.
निमित्त होते मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेचे. निवेदक व सूत्रसंचालक शाहीर वैराळकर यांचे ओघवते निवेदन तसेच मधून मधून कविवर्य सुरेश भट आणि इतर गझलकारांच्या काव्याची पखरण आणि रसिकांची त्यांना मिळालेली उत्स्फूर्त दाद यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत रंगतदार झाला. प्रमुख पाहुणे प्रताप होगाडे यांच्याहस्ते शिवप्रतिमा पूजन केले. गझलरंग कार्यक्रमाच्या सुरुवातीला सातारा येथील कवी भुतकर, सांगलीच्या कदम या युवा कवीने सादर केलेल्या प्रेम रचनांना रसिकांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जळगाव येथील कवयित्री राजपूत यांच्या गझलांमध्ये स्त्रीत्वाचा संवेदनशील आशय दिसून आला.
पुरंदर येथील कदम या युवा कवीने सामाजिक आशयाच्या गझल सादर केल्या. त्यानंतर अकोला येथील अमित वाघ या कवीनेही टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत वेगळ्या आशयाच्या आणि अंतर्मुख करणाऱ्या रचना त्यांनी सादर केल्या. त्यानंतर राधा भावे ज्येष्ठ कवयित्रीने जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या रचना सादर केल्या. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास शहर व परिसरातील रसिक आणि काव्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वागत केले. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले.कपिल पिसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संतोष आबाळे यांनी सूत्रसंचालन केले.
---------
गझलकारांची मैफिल आनंद देणारी
माहेराचे कौतुक असते आणि सासरचा तोरा - दोन चाळण्यामध्ये स्वतःला चाळत असते बाई, जन्मभर देईन सोबत हे कुणा सांगू नये- एवढा खोटेपणा नात्यांमध्ये आणू नये, चांदण्या मोजू नका रे त्रास होतो - आज नाहीतर उद्या हमखास होतो, यासारख्या गझल महाराष्ट्राच्या विविध भागातील नवीन गझलकारांनी सादर केल्या. ही मैफल रसिकांना निखळ आनंद देणारी ठरली. प्रत्येक कवीचे वेगळे सादरीकरण, वेगळा आशय, विषयातील विविधता यामुळे गझलरंग हा कार्यक्रम रंगतदार झाला आणि त्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रतिसाद मिळाला.