दहशत, दगडफेक

दहशत, दगडफेक

इचलकरंजीत हद्दपार गुंडाकडून दहशत

यंत्रमाग कामगाराच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

इचलकरंजी, ता.२३ : हद्दपार असलेल्या एका पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांनी यंत्रमाग कामगाराच्या घरात घुसून दहशत माजवली. तसेच घरावर दगडफेक करून कोयता उगारत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सलमान राजू नदाफ (रा. गावभाग) याच्यासह तिघांवर गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार महिन्यांपूर्वी अपघात झाल्यानंतर वाद मिटवल्याच्या रागातून त्यांनी हे कृत्य केले. याबाबतची फिर्याद सुनील भाऊसाहेब लंगोटे (वय ४८) यांनी पोलिसांत दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वजीर गँगमधून दहशत करत अनेक गुन्हे दाखल असणारा सलमान नदाफ याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहरात येण्यास मनाई असतानाही नदाफ याने आपल्या दोन साथीदारांसह सोमवारी (ता.२२) सायंकाळी गावभाग कट्टा परिसरातील सुनिल लंगोटे यांच्या घरात शिरला. चार महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतरचा वाद मिटवल्याच्या रागातून दहशत माजवली. सुनील यांना तुला खल्लास करतो, अशी जीव मारण्याची धमकी देत गळपट धरण्याचा प्रयत्न केला आणि ठार मारण्यासाठी अंगावर कोयता उगारला. यावेळी सुनील यांच्यासह कुटुंबिय त्याच्या तावडीतून निसटले. त्यांनतर नदाफ आणि इतर दोघांनी शिवीगाळ करत लंगोटे यांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी संसारोपयोगी साहित्याची नासधूस करत नुकसान केले. याप्रकरणी लंगोटे यांच्या फिर्यादीनुसार नदाफ याच्यासह तिघांच्या विरोधात गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-------

दहशत निर्माण करून नदाफ फरार

हद्दपारीच्या कारवाईचे उल्लंघन करून नदाफ शहरात आला. साथीदारांसह कोयत्याने दहशत माजवली. गावभाग परिसरात दिवसाढवळ्या दहशत निर्माण करून तो पसार झाला. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, पण त्याचे हे कृत्य पोलिस यंत्रणेला आव्हान देणारे असल्याची चर्चा परिसरात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com