खुनी हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनी हल्ला
खुनी हल्ला

खुनी हल्ला

sakal_logo
By

चंदूर येथे खुनी हल्ल्यात तिघेजण गंभीर

सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

इचलकरंजी, ता.२४ : चंदूर (ता. हातकणंगले) येथील सशस्त्र खुनी हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडसह टोळक्याने हा हल्ला केला. याप्रकरणी ७ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर चंदुर गावात तणावाचे निर्माण झाले आहे.
सचिन पिरगोंडा पाटील, जगदीश पिरगोंडा पाटील, विनय पाटील, अविनाश दादासो पाटील, बापूसो पाटील, शुभम सुनिल मगदूम व बाबासो शिंगाडे (सर्व रा. चंदूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हल्ल्यातील जखमी पवन इरगोंडा पाटील (वय २१), त्याचा भाऊ शरद इरगोंडा पाटील, चुलतभाऊ आवगोंडा पाटील (सर्व रा. चंदूर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता.२३) रात्री चंदूर येथील घरासमोर नऊ वाजण्याच्या सुमारास पवन पाटील हा उभा होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ शरद आणि चुलतभाऊ आवगोंडा पाटील हे दोघेही थांबले होते. यावेळी अचानक आलेल्या सात जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत पाटील बंधूंवर हल्ला चढवला. जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देत लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच तलवारीने वार आणि चाकूने भोसकल्याने तिघे भाऊ गंभीर जखमी झाले.

-------
खासगी सावकरीचा प्रकार
आर्थिक देवाणघेवाणीतून हा वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुख्य संशयित सचिन पाटील हा सावकारीतून व्याजाने पैसे देत असल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे.