भाजीपाल्याच्या दैनंदिन मागणीत घट

भाजीपाल्याच्या दैनंदिन मागणीत घट

06352
इचलकरंजी : प्रतीक्षेत असलेला बेबी हापूस बाजारात दाखल होत आहे.
------------
भाजीपाल्यांच्या दैनंदिन मागणीत घट
देशी सफरचंदांची आवक थांबली; डाळींच्या किमतीत चढउतार
इचलकरंजी, ता. २५ : बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत असून मागणीतही घट झाली आहे. त्यामुळे दरात चढउतार होताना दिसत आहे. एखाद्या दिवशी आवक फारच कमी झाली आणि मागणी वाढली की, दर चांगलेच तळपत आहेत. फळभाज्यांची परिस्थिती फार वेगळी नसून लग्नसराईचा अपेक्षित बूस्टर अद्याप मिळाला नसल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. सध्या भाजीपाल्यांच्या दैनंदिन मागणीत कमालीची घट झाल्याचे चित्र आहे.
फळ बाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक घसरली आहे. सफरचंदांची देशी आवक पूर्णतः थांबली असून परदेशी सफरचंदांवर समाधान मानावे लागत आहे. उत्पादन कमी झाल्याने कलिंगडही बाजारातून दुर्मिळ होत आहे. राणी अननसाची आवक कमी झाली असून राजा अननसाची आवक जोमात आहे. प्रतीक्षेत असलेला बेबी हापूस तुटक प्रमाणात दाखल झाला आहे. या लोकप्रिय आंब्याची यंदा इतकी आवक कमी झाली आहे की, हातगाड्यावर होणारी विक्री बुट्ट्यावर आली आहे. खाद्यतेलाची उतरण सुरूच आहे. डाळींच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत आहे.
प्रति किलो रुपये भाज्यांचे दर : टोमॅटो- २० ते २५, दोडका- ५० ते ६०, वांगी- २५ ते ३५, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची -४० ते ५०, फ्लॉवर- १५ ते २०, कोबी-१२ ते १५, बटाटा- २५ ते ३०, कांदा -१८ ते २०, पांढरा कांदा- २० ते २५, लसूण- ८० ते १००, आले- २०० ते २२०, लिंबू- १५० ते ४०० शेकडा, गाजर -३० ते ४०, बीन्स- १४० ते १५०, ओला वाटाणा -३० ते ४०, चवळी शेंगा - ७० ते ८०, भेंडी- ६० ते ८०, काकडी- ४० ते ५०, गवार- ६० ते ८०, रताळे - ३० ते ४०, दुधी -३० ते ४०, कोथिंबीर-३० ते ३५, मेथी - २५ ते ३०, अन्य पालेभाज्या १५ ते २० रुपये, शेवगा ३ ते ५ रुपये नग.
- - --- - - -
फुले : झेंडू -४०-५०, निशिगंध-६०-७०, गुलाब -१५०, गलांडा- ६०-७०, शेवंती- १२०-१५०.
- - - -- - -
फळे : सफरचंद- २०० ते २२०, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १०० ते १५०, चिकू- ८० ते १२०, पेरू- ८० ते १००, खजूर - १५० ते २००, पपई- ३० ते ५०, खजूर-१२० ते १६०, मोर आवळा -१०० ते १२०, केळी - ४० ते ५० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अंजीर - २००, टरबूज ५० ते ६०, अननस -४० ते ५० रुपये नग.
-- -
खाद्यतेल : सरकी -१०५ ते ११०, शेंगतेल - १६० ते १७०, सोयाबीन -१०५ ते ११०, पामतेल -१०५ ते ११०, सूर्यफूल -११० ते ११५.
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३५ ते ५५, बार्शी शाळू- ४० ते ५५, गहू- ३० ते ३८, हरभराडाळ -६४ ते ६६, तूरडाळ- १२५ ते १३२, मूगडाळ - १०५ ते ११८, मसूरडाळ - ७८, उडीदडाळ- १०५ ते ११५, हरभरा- ५५ ते ५८, मूग- ९४ ते १०५, मटकी- १२५ ते १३०, मसूर- ७०, फुटाणाडाळ -७० ते ७२, चवळी- ७५ ते ८३, हिरवा वाटाणा- ५५, छोला -१२५ ते १४०.
- - - - - - - - - - - -
मुहूर्तानुसार फुलांना मार्केट
कडक उन्हाळा आणि लग्नाचे मुहूर्त यामुळे फुलांना चांगले मार्केट येते; पण यंदा हे गणित कोलमडल्याचे दिसत आहे. उन्हाळा असून फुलांचे उत्पादन कमी झालेले नाही. सध्या फुलांचा बाजार लग्न समारंभावर अवलंबून आहे. त्यामुळे मुहूर्तानुसार फुलांना भाव मिळत आहेत. मुहूर्त नसले की, हाच भाव गळून पडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com