
आत्मदर्शन शिबिराचा प्रारंभ
06354
इचलकरंजी : आत्मदर्शन शिबिराचे उद्घाटन योगगुरु संजीव कुलकर्णी, सत्यनारायण धूत यांच्या उपस्थितीत झाले.
आत्मदर्शन शिबिराचा प्रारंभ
इचलकरंजी : सदैव आनंदी, निरोगी व तणावमुक्त जीवनासाठी असणाऱ्या आत्मदर्शन शिबिराचे उद्घाटन योगगुरु संजीव कुलकर्णी यांच्याहस्ते झाले. शिबिर रोटरी क्लब येथे ४ जुनपर्यंत चालणार आहे. मी आनंद स्वरूप आहे. शरीर, मन, बुद्धी, शुद्ध ठेवली पाहिजे. आसने, प्राणायामद्वारे संपूर्ण शरीर व मनाचे संतुलन होऊन स्थिरता प्राप्त होते, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. अनेकांनी आत्मदर्शन शिबिराचे अनुभव सांगितले. स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धूत यांनी केले. सूत्रसंचालन उज्वला मतवाडे, प्रकाश रावळ यांनी केले. सुप्रिया गोंदकर, अण्णासाहेब शहापुरे, प्रतिमा खटावकर, सविता मकोटे आदी उपस्थित होते.
------
06355
कोल्हापूर : व्यंकटेश महाविद्यालयातील बीकॉम आय.टी.विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा पार पडला.
‘व्यंकटेश’च्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयातील बीकॉम आय.टी. विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा झाला. बियाणी टेक्नॉलॉजी प्रा. लि. कोल्हापूर येथे त्यांच्याशी झालेला सामंजस्य करारा अंतर्गत या अभ्यास भेटीचे आयोजन केले होते. बियाणी टेक्नॉलॉजी येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची कामकाज प्रणाली, असणारे विविध विभाग, आयटी क्षेत्रात असणाऱ्या नोकरीच्या विविध संधी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्पादित केले जाणारी विविध उत्पादने याबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. अभ्यास भेट यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने व उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. एम. मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.
------
स्त्री शक्ती समाधान शिबीर आज
इचलकरंजी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान तालुकास्तरीय शिबीर घोरपडे नाटयगृहात आयोजित केले आहे. शुक्रवारी(ता. २६) सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत होणार आहे. हातकणंगले तालुक्यातील महिलांसाठी शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबीरासाठी खासदार धैर्यशिल माने, आमदार राजु आवळे, आमदार प्रकाश आवाडे यांची उपस्थिती असणार आहे. शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---------
रक्तदान शिबीर आज
इचलकरंजी : रयत सोशल फाउंडेशन व लक्ष्मण पारसे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर शुक्रवारी(ता. २६) सकाळी १० वाजल्यापासून आसरानगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात होणार आहे. शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.