
सुख दुःख विसरून समाजास मदत करा
06358
इचलकरंजी : रोटरी गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लबकडून गरजूंना मदत केली.
-----------
सुख दुःख विसरून समाजास मदत करा
व्यंकटेश देशपांडे; रोटरी क्लब इचलकरंजीला भेट
इचलकरंजी, ता. २६ : माणसाकडे जिद्द असेल तर यश आज शक्य आहे. प्रयत्न करणे आपल्या हातात असते. प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. रोटरीची प्रतिमा जनमाणसात उच्च स्थानावर आहे. समाजातील माणसे रोटरीवर विश्वास ठेवतात. आपल्याकडे खूप काही असते, मात्र देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सुख दुःख विसरून समाजासाठी मदत करावी, असे प्रतिपादन रोटरीचे गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे (बेळगाव) यांनी केले.
रोटरी क्लब इचलकरंजीला अधिकृत भेटीप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्याहस्ते तीन गरजू विद्यार्थ्यांना सायकल प्रदान, माय फाऊंडेशनच्या सायकल बँक योजनेस पाच सायकली प्रदान, एका दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकल, गरजू महिलेस उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन प्रदान केले. रुग्णसेवेसाठी ॲम्बुलन्ससाठी दीड लाखाची मदत रोटरी क्लब अतिग्रेस दिली. रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सचिव प्रकाश गौड यांनी अहवाल सादर केला. संध्या देशपांडे, पुष्पा धूत, विजयश्री गौड उपस्थित होते.
इधांत कोथळे याने वयाच्या अकराव्या वर्षी हिमालयाच्या दुर्गम भागातील एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प पूर्ण केल्याबद्दल त्याचा गौरव केला. थ्रीडी प्रिंटिंग मटेरियलवर सेंट्रल गव्हर्नमेंट आयआयटी दिल्ली येथे रिसर्च सेंटरमध्ये निवड झाल्याबद्दल अथर्व माळी याचाही गौरव केला. असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कांबळे, गोपाल चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय पीडीजी महेंद्र मुथा यांनी केला. आभार प्रकाश गौड यांनी मानले. सूत्रसंचालन मनिष मुनोत यांनी केले. नियोजन संजय घायतिडक यांनी केले.