खूनी हल्ला अटक

खूनी हल्ला अटक

06367

इचलकरंजी : चंदूर सशस्त्र खूनी हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले.
...

चंदूर खूनी हल्ल्याप्रकरणी
तिघांना पोलिस कोठडी
इचलकरंजी, ता.२६ : चंदूर (ता. हातकणंगले) येथील सशस्त्र खूनी हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन दिवसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम सुनिल मगदूम, सचिन पिरगोंडा पाटील, विनय पाटील अशी त्यांची नावे आहे. तिघांना आज पोलिसांनी येथील न्यायालयात हजर केले असता ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणातील आणखी चौघे संशयित अद्याप फरार आहेत.
चंदूर येथे आर्थिक देवघेवीतून सातजणांच्या टोळक्याने पवन पाटील, त्याचा भाऊ शरद आणि चुलतभाऊ आवगोंडा पाटील या तिघांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात ठार मारण्याच्या उद्देशाने तिघांवर लाथाबुक्क्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तर तलवार, चाकूने वार केले. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पवन पाटील याच्या फिर्यादीनुसार सातजणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आज शुभम मगदुम, सचिन पाटील आणि विनय पाटील या तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने आज ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अविनाश दादासो पाटील, जगदीश पिरगोंडा पाटील, बापूसो पाटील, बाबासो शिंगाडे हे चार जण अद्याप फरार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com