चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी
चोरी

चोरी

sakal_logo
By

इचलकरंजीत किराणा दुकानातील रक्कमेवर डल्ला

इचलकरंजी : येथील आवळे गल्लीतील बंद किराणा दुकानातील रोख १५ हजार रुपये चोरीला गेले. देवराज शिवाजी जाधव (वय ४५) यांच्या लक्ष्मी किराणा दुकानात ही चोरी रविवारी (ता.२८) रात्री झाली. चोरट्याने दुकानाच्या छतावर चढून बेंगलोरी कौले काढली आणि प्लायवूडचे सीलिंग फोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील लाकडी चौकोनी बनावटीच्या पैसे ठेवण्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला. जाधव यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.