लग्न हेलिकॉप्टर देवदर्शन

लग्न हेलिकॉप्टर देवदर्शन

06393

इचलकरंजी : येथील दोन नव वधूवरांनी लग्नानंतर हेलिकॉप्टरमधून अवकाशी देवदर्शन घेतले.
...

चक्क हेलिकॉप्टरमधून वधूवरांचे देवदर्शन

कबनूर ता.३० : रांगड्या कोल्हापुरात हौसेला मोल नसते, याची प्रचिती वारंवार येत असताना कोरोची (ता. हातकणंगले) येथे एक नादखुळा लग्न पाहायला मिळाले. दोघे नवरदेव पत्नींना घेवून चक्क हेलिकॉप्टरमधून देवदर्शनसाठी निघाले. हा थाट पाहून नातेवाईक, पै पाहुणे आणि मित्रमंडळी चाट पडले. हेलिकॉप्टरमधून नवनाथ व संजना तसेच शशिकांत व प्रियंका या उभयतांनी जोतिबा, अंबाबाई मंदिरासह येथील शिवतीर्थवर दर्शन घेत पुष्पवृष्टी केली.

येथील गंगानगरमधील रत्नदीप वसाहतनजीक असणाऱ्या गणेशनगर गल्ली क्रमांक ९ मधील दिवंगत डॉ.आप्पासाहेब माळी यांचे चिरंजीव नवनाथ व नॉर्थ गोवा येथील संतोष गोसावी यांची सुकन्या संजना तसेच माळी यांची सुकन्या प्रियंका व नॉर्थ गोवा येथील संतोष माळी यांचे चिरंजीव शशिकांत यांचा विवाह कोरोची-हातकणंगले स्टेशन रोडवरील रघुजानकी मंगल कार्यालयात आज सायंकाळी शाही थाटामाटात पार पडला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही वधुवरांनी एकमेकांच्या बंधनात अडकल्यानंतर अवकाशी देवदर्शनासह पुष्पवृष्टी करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच बुक केले.
कोरोचीतील रघुजानकी सांस्कृतिक भवन येथून त्यांनी हेलिकाँप्टरमधून श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरकडे प्रस्थान केले. त्यांनी श्री जोतिबा मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली व आशीर्वाद घेतले. त्यानंतर कोल्हापूरमधील श्री अंबाबाई मंदिरावर पुष्पवृष्टी केली. शेवटी शहरातील शिवतीर्थवर पुष्पवृष्टी करून आशिर्वाद घेतले.
-------

पंचक्रोशीत चर्चा अन् कार्यालयात गर्दी
आज दुपारच्या सुमारास कोरोची येथे लग्नात वधू वर हेलिकॉप्टरमधून हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नाचा शोध घेवून अनेकानी मंगल कार्यालय गाठले. लग्न झाल्यावर दोन्ही जोडपी चक्क हेलिकॉप्टरमधून रवाना झाली.आपली हौस मौज पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करतात,याचा अनुभव त्याठिकाणी घेतला. या लग्नाची भारीच चर्चा रंगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com