बिशप कॉलेजचा निकाल १०० टक्के
बिशप कॉलेजचा निकाल १०० टक्के
इचलकरंजी : येथील बिशप ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. अनुक्रमे सानिका मिरजे ८१.५०, शाफिन शिकलगार ७६.६७, इरुमसाबा सत्तारमेकर हिने ७६ टक्के गुण मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांचा चेअरमन हाजी कैश बागवान, व्हाईस चेअरमन इम्तियाज म्हैशाळे, समीर शेख, रिजवान मुजावर यांचा सत्कार केला. प्रा. अयुब अवटी, प्रा. नसीमा नदाफ, तहसीन बागवान, हुसेन गड्याळ यांनी उपस्थित होते.
-------
बामणे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
इचलकरंजी : आंतरभारती विद्यालयातील एम. पी. बामणे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष शामराव नकाते, उपाध्यक्ष श्री. जगदाळे यांच्याहस्ते श्री. बामणे यांचा सत्कार केला. सौ के. सी. शिंदे, ए. ए. हीरीकुडे, विठ्ठल जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन पी. पी. सातपुते यांनी केले. ३७ वर्षाच्या सेवचे ऋण व्यक्त करत अनेक आठवणींना उजाळा बामणे यांनी दिला. स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक एम.डी. पाटील यांनी केले. एम.के . कोळी यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका व्ही. सी. फाटक यांनी आभार मानले.
---
‘नवचैतन्य’मध्ये उन्हाळी शिबीर
इचलकरंजी : येथील नवचैतन्य बालगृहात उन्हाळी शिबीर झाले. शाहीर संजय जाधव यांच्या शाहीरी पोवाड्याचा आस्वाद शिबिरार्थींनी घेतला. वक्तृत्व कला, चित्रकला, योगा, लाठीकाठी, कराओके, गायन आदी प्रशिक्षण दिले. शिबिरात सुधीर शेवाळे, महेश चौगुले, सागर कांबळे, सुभाष कांबळे, संजय जाधव, गणेश शिंदे, ओंकार कदम, हेमांजली पोतदार, साधना कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अधीक्षक ए.व्ही कोळेकर यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष सौरभ आव्हाड, संस्थेचे अध्यक्ष रामराव आव्हाड, संतोष बिद्रेवाडी, महादेव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. बिद्रेवाडी यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.