सोयाबीन, भुईमुगावर लक्ष केंद्रित

सोयाबीन, भुईमुगावर लक्ष केंद्रित

06399
हातकणंगले : कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून महिला शेतकरी पेरणीपूर्व सोयाबीन उगवण क्षमता चाचणी करत आहेत.
----------------------------------
लोगो ः तयारी खरिपाची - भाग ३
-------------------
सोयाबीन, भुईमुगावर लक्ष केंद्रित
हातकणंगले तालुक्यात २३ हजार हेक्टरवर पेरणीचे कृषी विभागाचे नियोजन
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.१ : खरीप हंगामात यंदा हातकणंगले तालुक्यात सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. तालुक्यात उत्पादनवाढीसाठी सोयाबीन, भुईमूग या खरिपातील प्रमुख पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. एकूण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र यंदा २० टक्क्यांनी वाढवण्यास कृषी विभाग अनुकूल आहे.
तालुक्यात खरिपाचे क्षेत्र हे अधिक आहे. सध्या कडक उन डोक्‍यावर घेऊन शेतकरी खरिपाच्या पूर्वतयारीला लागला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना दरवर्षी करावा लागतो. हे होऊ नये म्हणून कृषी विभागही सज्ज झाला आहे. हातकणंगले तालुक्‍यात २३ हजारांवर हेक्‍टर शेती खरीपाखाली येणार आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांचा वापर, रोपवाटिका व्यवस्थापन, योग्य वयाच्या रोपांची पुनर्लागवड, योग्य प्रमाणात रोपांचा वापर, चार सूत्री लागवड, एकात्मिक खते, कीड, तण व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व काढणी पश्चात मूल्यसंवर्धन आदी उपाययोजना राबवण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके गावपातळीवर घेतले जात आहे.
गावोगावी बियाणे बाजारही भरवण्यात येणार आहे.अनेक कंपन्यांच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळा सोसाव्या लागतात. यामुळे तालुका कृषी विभागाने यासाठी नवसंकल्पना रुजवत गतवर्षी बियाणे बाजार भरवला. यावर्षीही हा बाजार गावोगावी भरवत शेतकऱ्यांना आधार दिला जाणार आहे. ग्राम बीज उत्पादनातून शेतकऱ्यांच्याच बियाणांची विक्री शेतकऱ्यांना केली जाणार आहे. खरीप हंगामात बियाणे व खते खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास विक्रेता व कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. तसेच फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, जेणेकरून नुकसान भरपाई मिळण्यास मदत करता येईल. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुधारित पद्धतीने खरीप पिके घेऊन उत्पादकता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.
(समाप्त)
---
खरीप पेरणी नियोजन
प्रमुख पीके * सरासरी क्षेत्र(हेक्टर)
भुईमूग * ८६३५
सोयाबीन* १०६९१
भात* ६८२
ख. ज्वारी* ८५०
उडीद* २९०
मूग* ४०३
---
दृष्टीक्षेपात
तालुका कृषी अधिकारी - १
मंडल कृषी अधिकारी - ३
कृषी पर्यवेक्षक - ६
कृषी सहाय्यक - ३६
एकुण - ४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com