मुख्याध्यापकपदी कोळी यांची नियुक्ती

मुख्याध्यापकपदी कोळी यांची नियुक्ती

मुख्याध्यापकपदी
कोळी यांची नियुक्ती
इचलकरंजी : येथील दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी बी. ए.कोळी यांची नियुक्ती केली. मुख्याध्यापक एस. ए. पाटील हे निवृत्त झाल्याने या पदावर श्री. कोळी यांची वर्णी लागली. ते विद्यालयात १९९५ पासून हिंदी विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे विद्यालयाच्या विविध उपक्रमात कृतिशील योगदान आहे. संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे यांचा प्रमुख उपस्थितीत त्यांनी पदभार घेतला. निवृत्त मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी श्री. कोळी यांना जबाबदारीची जाणीव करून देत पुढील सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक डी. ए. तराळ यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मुरदंडे, सचिव शेखर पाटील आदी उपस्थित होते.
---
‘गोविंदराव’मध्ये
करिअर मार्गदर्शन
इचलकरंजी : येथील गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. ५) सकाळी नऊ वाजता हे शिबिर होणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले यांच्यावतीने आयोजित शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी, महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना, करिअर प्रदर्शन यांसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. शहर व ग्रामीण भागातील दहावी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com