विनयभंग धमकी पोक्सो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनयभंग धमकी पोक्सो
विनयभंग धमकी पोक्सो

विनयभंग धमकी पोक्सो

sakal_logo
By

‘पोक्सो’ कायद्या अंतर्गत
इचलकरंजीत तरुणास अटक

पिडीतेला फोटो व्हायरल करण्याची धमकी

इचलकरंजी, ता.८ : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. अशी माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांनी दिली. साद मुजावर (वय २१, रा. चंदूर ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, असाच आणखी एक प्रकार नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, तक्रार दाखल नसल्याने पोलिसांनी याबाबत कारवाई केली नाही.
शिवाजीनगर पोलिसातून मिळालेली माहिती अशी, एका दुकानात संशयित मुजावर काम करतो. सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियातून मुजावर याने पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. वारंवार चॅटींग करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. या ओळखीतून वेळोवेळी कॉफी शॉपमध्ये नेऊन लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका विशिष्ट समाजप्रमाणे तोंडाला स्टोल जबरदस्तीने बांधायला लावला. यातून स्टोल बांधल्याचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने मुलीला जातीवाचक शिवीगाळ करत फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या मामाच्या मित्राच्या मोबाईलवर हे व्हायरल झालेले फोटो निदर्शनास आले. त्यानंतर पीडित मुलीने याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मुजावर याच्यावर पोक्सो अंतर्गत व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान , या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी राजकीय मंडळीनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र , पीडित मुलीच्या बाजूने मोठा जमाव पोलिस ठाण्याच्या आवारात होता. रात्री उशिरा मुजावरवर गुन्हा नोंद करून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे एका अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रकार एका शासकीय इमारतीवर घडला. संबंधित तरुणाला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, याबाबत संबंधित मुलगी अथवा नातेवाईकांनी तक्रार दिली नाही. यामुळे या प्रकरणावर पडदा पडला.