Sat, Sept 23, 2023

चोरी
चोरी
Published on : 8 June 2023, 7:20 am
उघड्या घरातून 70 हजाराचे मंगळसूत्र चोरीस
इचलकरंजी : उघड्या घरातून 70 हजार किंमतीचे मंगळसूत्र चोरीस गेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद शोभा मधुकर पाटील यांनी पोलिसांत दिली आहे. येथील थोरात चौक परिसरातील पाण्याच्या टाकीसमोर शोभा पाटील यांचे घर आहे. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सोन्याची चेन , मनी , चॉकलेटी व काळ्या रंगाचे मिनार बसविलेल्या मंगळसूत्रावर डल्ला मारला. असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.