पुरात चिंचवाडला मदत न करण्याचा ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरात चिंचवाडला मदत न करण्याचा ठराव
पुरात चिंचवाडला मदत न करण्याचा ठराव

पुरात चिंचवाडला मदत न करण्याचा ठराव

sakal_logo
By

पूरकाळात चिंचवाड ग्रामस्थांना मदत नाही
उदगाव ग्रामसभेत ठराव; काही ग्रामस्थांचा विरोध; तलाव सुशोभीकरणास मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३ : चिंचवाड येथील ग्रामस्थांना महापूर व नैसर्गिक आपत्ती काळात उदगावमध्ये कोणत्याही सुविधा द्यायच्या नाहीत, असा ठराव उदगाव (ता. शिरोळ) येथे झालेल्या ग्रामसभेत केला. अध्यक्षस्थानी सरपंच कलीमुन नदाफ होत्या.
सभेत मागील प्रोसेडिंगचे वाचन ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांनी केले. यात रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, विकास कामांबाबत चर्चा करणे, वैयक्तिक लाभाचे लाभार्थी निवडणे, सांडपाणी व्यवस्थापन, पंधरावा वित्त आयोग, आलेल्या अर्जाचे वाचन करणे, ग्रामनिधी व नळ पाणीपुरवठा निधी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना असे दहा विषय ठेवले.
आयत्यावेळी गाव तलाव सुशोभीकरण व सांडपाणी काढणे, पेयजल योजनेचा आराखडा पूर्ण करणे यासह विविध विषयांना मंजुरी दिली. दरम्यान, चिंचवाड गाव महापुरात सर्वप्रथम पाण्याखाली जाते. या काळात ग्रामस्थांना उदगावमध्ये कोणत्याही सुविधा द्यायच्या नाहीत, असाही ठराव मंजूर केला आहे. काही ग्रामस्थांनी विरोध केला. मात्र, तो मंजूर केला.
उपसरपंच रमेश मगदूम, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पुजारी, अरुण कोळी, सलीम पेंढारी, मेघराज वरेकर, सावित्री मगदूम, दीपिका कोळी, सुवर्णा सुतार, रुक्मिणी कांबळे, दिलीप कांबळे, भारती मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ठराव बेकायदेशीर
तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ व गटविकास अधिकारी शंकर कवितगे यांच्याशी संपर्क केला असता. ते म्हणाले, ‘उदगांव ग्रामपंचायतीने केलेला ठराव बेकायदेशीर आहे. आपत्ती काळात माणसाचा जीव वाचविण्यासाठी प्रशासन कार्यरत असते. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संकट काळात सोयी दिल्या जातात. त्यामुळे उदगाव ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाला कोठेही ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे हा ठरावच बेकायदेशीर आहे.’

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02576 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top