
अन्नधान्य वाटप
खिदमत फौंडेशनकडून
गरजूना मदतीचे वाटप
जयसिंगपूर, ता.४ : येथील खिदमत फौंडेशनच्यावतीने मुस्लीम बांधवाकडून जकात गोळा करुन गरजवंताना प्रत्येकी एक हजार व शंभर रेशन किट व गरजवंत आठ शालेय विद्यार्थ्यांनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. यावेळी खिदमत फौंडेशनचे अध्यक्ष रुस्तुमभाई मुजावर यांनी उपक्रमाची माहिती दिली.
शहर व परिसरातील मुस्लीम बांधवांकडून जकात गोळा करुन गेली दोन वर्षे लॉकडाऊन काळातदेखील दोनशे रेशन किट जयसिंगपूर, चिपरी, उदगांव, नांदणी, शिरढोण परीसरात वाटप करणेचे पवित्र काम केले असून यावर्षी यातील काही रक्कम उज्वल शिक्षणासाठी होतकरु गरजवंत मुलींसाठी खर्च करणेचे ठरवून आठ लेडीज सायकल देणेचा संकल्प केला आहे. या उपक्रमास समाजातील सर्व घटकातील बांधवांचा सहकार्य मिळकत लॉकडाऊन काळात बहुसंख्य हिंदू बांधवांना देखील जेवण व अन्नधान्य साहित्य पुरवले होते व चालू वर्षीच्या कार्यक्रमास खिदमत फौंडेशनचे शकील गैबान, शफी मुजावर, जुल्फीकार जमादार, माजीद तिवडे, मुबारक मुजावर, साजीद गवंडी, मुबारक मुजावर, अमन मुजावर, साकीब मुजावर, तौफीक भटारी, साहील मुजावर, फिरोज मुजावर, यासीन बागवान, वासीम भटारी हे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02578 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..