टुडे पान एक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक
टुडे पान एक

टुडे पान एक

sakal_logo
By

अकिवाट-टाकळीवाडीत होणार औद्योगिक वसाहत
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पुढाकार ः राज्य सरकारचे पथक पाहणीसाठी येणार
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ४ : शिरोळ तालुक्याचे क्षेत्रफळ कमी आहे. मात्र, दाट लोकसंख्या असल्याने तालुक्याचे शहरीकरण होत आहे. तालुक्यात ५२ गावे व तीन शहरांचा समावेश आहे. येथील प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, अशी भावना घेऊन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील अकिवाट-टाकळीवाडीच्या माळावर चौथी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत मुंबई मंत्रालयात याबाबत बैठक झाली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत राज्य सरकारचे पथक अकिवाट-टाकळीवाडी येथे पाहणीसाठी येणार आहे. त्यामुळे शिरोळच्या औद्योगिकरणाला आणखी बळ मिळणार आहे.
तालुक्यात यड्राव येथे पार्वती इंडस्ट्रियल, उदगाव येथे ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत व मौजे आगर येथे राजर्षी शाहू इंडस्ट्रियल कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये ५० हजार नागरिकांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र, या तीन औद्योगिक वसाहतीत जयसिंगपूर, शिरोळ परिसरात असल्याने शिरोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील सैनिक टाकळी, कुरूंदवाड, टाकळीवाडी, अकिवाट, हेरवाड, अब्दुललाट, घोसरवाड यासह अन्य गावांतील नागरिकांना कामासाठी इचलकरंजी किंवा जयसिंगपूर परिसरात यावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांना काम मिळावे, यासाठी मंत्री यड्रावकर यांनी पुढाकार घेतला आहे. अकिवाट व टाकळीवाडी गावच्या हद्दीत गुरुदत्त साखर कारखान्याच्या परिसरात शासकीय जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरात उद्योग, व्यवसाय उभारल्यास येथील नागरिकांच्या हाताला काम मिळेल. या हेतूने त्यांनी औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी या औद्योगिक वसाहतीला हिरवा कंदील दिल्याने येत्या दहा दिवसांत राज्याचे पथक जागा पाहणीला येणार आहे. त्यामुळे आता शिरोळ दक्षिण भागातील नागरिकांच्या हाताला चांगले काम मिळणार आहे.
....
कोट
युवकांच्या हाताला रोजगार देणे गरजेचे आहे. जयसिंगपूर परिसरातील औद्योगिक वसाहतीमुळे हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. शिरोळच्या दक्षिण भागातील नागरिकांनाही गावाजवळ रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अकिवाट व टाकळीवाडी परिसरात नवे औद्योगिक वसाहत उभी करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्याकडून सकारात्मक चर्चा झाल्याने लवकरच हे पथक पाहणी करेल. त्यानंतर पुढील कार्यवाही करू.
-राजेंद्र पाटील यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02581 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top