इनोव्हेट 2k22 स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनोव्हेट 2k22 स्पर्धा
इनोव्हेट 2k22 स्पर्धा

इनोव्हेट 2k22 स्पर्धा

sakal_logo
By

फोटो-JSP22B03025

जयसिंगपूर: ''इनोव्हेट 2k22'' च्या स्पर्धेच्या बॅनरचे प्रकाशन प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील आदी.

मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये
प्रॉब्लेम स्टेटमेंट स्पर्धेचे आयोजन
जयसिंगपूर, ता.४: येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ''इनोव्हेट 2k22'' प्रॉब्लेम स्टेटमेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.
डिप्लोमा अभियांत्रिकी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या संशोधनवृत्तीला वाव देण्यासाठी ''इनोव्हेट 2k22'' चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन प्रथम फेरीत क्वीज राऊंड, दुसऱ्या फेरीत आयडिया प्रेझेंट करण्यासाठी वाव दिला जाणार आहे व तिसऱ्या आणि अंतिम फेरीत पेपर व त्यांच्या आइडियाची अंमलबजावणी तपासली जाणार असल्याची माहिती आर.अँड डी. सेलचे डीन व आयोजक डॉ. डी. बी. देसाई यांनी दिली.
देशपातळीवरील डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रवेश असून प्रवेश फी दोनशे रुपये आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थी सहभाग ऑनलाइन, ऑफलाइन व स्पॉट रजिस्ट्रेशनने नोंदवू शकतात. या कॉम्पिटिशनसाठी रोख रकमेची बक्षिसे असून विजेत्यास व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अभियांत्रिकीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, स्थापत्य वास्तुकला, संगणकीकृत माहितीशास्त्र इत्यादींमध्ये संशोधनात रस असणाऱ्या डिप्लोमा विद्यार्थ्यांकरता इनोव्हेट 2k22चे आयोजन करण्यात येत आहे. देशासाठी नवीन संशोधनाची दिशा देण्यासाठी या कम्पीटीशनचे आयोजन निश्चित दिशादर्शक ठरेल असा विश्वास डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.विजय मगदूम यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02582 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top