मंडलिक याना मागच्या दराने येण्याची गरज नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडलिक याना मागच्या दराने येण्याची गरज नाही
मंडलिक याना मागच्या दराने येण्याची गरज नाही

मंडलिक याना मागच्या दराने येण्याची गरज नाही

sakal_logo
By

मागच्या दाराने येण्याची
मंडलिकांना गरज नाही
खासदार मंडलिक; गोकुळ स्वीकृत निवडीवर भाष्य टाळले

जयसिंगपूर, ता. ५ : मंडलिक घराण्याला राजकारणात आणि समाजकारणात मागच्या दाराने येण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोकुळमध्ये स्वीकृत सदस्यबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने पुन्हा स्वीकृत सदस्यपद मागणे योग्य ठरणार नाही. जाधवांना ज्यांनी विरोध केला होता अखेर त्यांना हे पद द्यावे लागले, असे परखड मत खासदार संजय मंडलिक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
मुलगा व बहिणीचा गोकुळमध्ये पराभव झाला आहे. त्यांना संधी मिळायला हवी होती, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत जीवाचे रान करून सत्ताधारी आघाडीबरोबर राहून उच्चांकी मताने उमेदवारांना तालुक्यातून विजयी केले. अमरसिंह पाटील यांच्या गळ्यात स्वीकृत सदस्य पदाची माळ पडणार, अशी चर्चा होती. याला उत्तर देताना खासदार मंडलिक म्हणाले, ‘‘नेत्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सामोपचाराने हा विषय सोडवायला हवा होता. जे आता स्वीकृत सदस्यपदी निवड झालेले आहेत, त्या भागातील नेत्यांनी सोयीचे राजकारण खेळले आहे का, याबाबत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.’’

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02591 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top