तेढ होईल असे प्रकार घडणार नाहीत जयसिंगपूरमध्ये प्रमुखांकडून विश्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेढ होईल असे प्रकार घडणार नाहीत जयसिंगपूरमध्ये प्रमुखांकडून विश्‍वास
तेढ होईल असे प्रकार घडणार नाहीत जयसिंगपूरमध्ये प्रमुखांकडून विश्‍वास

तेढ होईल असे प्रकार घडणार नाहीत जयसिंगपूरमध्ये प्रमुखांकडून विश्‍वास

sakal_logo
By

03045
जयसिंगपूर : पोलिस ठाण्यातील शांतता समितीच्या बैठकीत पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह मान्यवर.

तेढ होईल असे प्रकार घडणार नाहीत
जयसिंगपूरमध्ये प्रमुखांकडून विश्‍वास; पोलिस ठाण्यात शांतता बैठक
जयसिंगपूर, ता. ६ : राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर नगरीमध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. दोन जातींमध्ये तेढ निर्माण होईल आणि दोन समाजामध्ये वाद होईल, असा कोणताही प्रकार जयसिंगपूर शहरामध्ये घडणार नाही असा विश्‍वास, शहरातील सर्वपक्षीय व समाजातील प्रमुखांनी व्यक्त केला.
जयसिंगपूर पोलिस ठाण्यात सर्वपक्षीय, विविध समाजांतील प्रमुखांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के अध्यक्षस्थानी होते. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांनी स्वागत केले. यानंतर माजी नगरसेवक सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव- घुणकीकर, नितीन बागे अॅड. संभाजीराजे नाईक, रमेश शिंदे, रघुनाथ देशिंगे, भगवंत जांभळे यांनी मनोगत व्यक्त करून आम्ही शहरातील नागरिक जातिभेद मानत नाही. सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने निश्‍चिंत रहावे, असे सांगितले.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के म्हणाले, ‘‘राज्यामध्ये विविध कारणाने काही जण जातीय तेढ निर्माण होईल, असे व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत आहेत. या पोस्ट आपल्याकडून पुढे फॉरवर्ड होऊन जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येकाने सतर्क राहावे. अशा पोस्ट डिलिट कराव्यात, जाणूनबुजून अशा पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.’’ बैठकीस मिलिंद भिडे, डॉ. आतिक पटेल यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. गोपनीय विभागाचे पोलिस विजय पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02593 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top