चिंचवाडमध्ये रविवारी जैन युवा संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवाडमध्ये रविवारी जैन युवा संमेलन
चिंचवाडमध्ये रविवारी जैन युवा संमेलन

चिंचवाडमध्ये रविवारी जैन युवा संमेलन

sakal_logo
By

चिंचवाड येथे उद्या
जैन युवा संमेलन
जयसिंगपूर, ता. ६ : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे रविवारी (ता. ८) दक्षिण भारतातील पहिलेच जैन युवा संमेलन होत आहे. श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर चिंचवाड व जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन होत आहे. जैन युवक-युवती व श्रावक-श्राविकांनी संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून जैन धर्म पंतमुक्त करणे, प्राचीन परंपरांचे संरक्षण करणे, युवक-युवती सक्षमीकरण करणे, व्यसनमुक्ती, शाकाहारी सदाचारी युवक घडवणे यासह विविध उद्दिष्ट्ये ठेवून दुपारी दोन वाजता जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली जैन युवा संमेलन होत आहे.
संमेलनाचे उद्घाटन स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून अर्चना मगदूम-गाट या ‘युवक-युवती संक्षमीकरण’ या विषयावर तर प्रा.डॉ. सुरज मडके ‘गौरवशाली इतिहासातून उज्वल भविष्याकडे’ विषयावर व राजकुमार चौगुले ‘व्यसनमुक्ती काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
वीर सेवा दल अध्यक्ष शशिकांत राजोबा, सन्मती संस्कार मंच अध्यक्ष सुरेश चौगुले, दक्षिण भारत जैन सभेचे कर्नाटक राज्य महामंत्री बाळासाहेब पाटील, वीर महिला मंडळ अध्यक्ष विजयाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनाला कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक सीमा भागातील जैन श्रावक - श्राविका उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02596 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top