
पोल हाटल्याने सुरक्षित बनली शाहूनगरची वाहतूक
03054
जयसिंगपूर: पोल हटविल्यानंतर सुरक्षित बनलेला मार्ग.
जयसिंगपुरातील धोकादायक खांब हटविले
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; स्वाभिमानी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
जयसिंगपूर,ता.७ : अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेले शाहूनगरच्या मध्यभागातील धोकादायक विद्युत खांब ''स्वाभिमानी'' पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने अखेर हटविले. अनेक वर्षांपासूनची नागरिकांची डोकेदुखी संपली असून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. अनेक वर्षांपासून येथील शाहूनगरमध्ये रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब वाहतुकीस अडथळा ठरत होते. शिवाय या खांबांमुळे अपघात झाले आहेत. येथील स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब हटवावेत, यासाठी आंदोलन करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. अखेर स्वाभिमानीच्या पाठपुराव्याला यश आले असून रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब हटविले. स्वाभिमानीचे कार्यकर्ते शंकर नाळे, सागर मादनाईक व शैलेश आडके आदींनी दीड वर्षापासून प्रयत्न सुरू केले होते. यासाठी महावितरण कंपनीकडून ९ लाखांचा निधी मंजूर करून घेवून कामाला सुरवात झाली होती. पण त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने काम पूर्ण करण्यास विलंब झाला होता. अखेर चार दिवसांपासून हे विद्युत खांब हटविण्याचे काम सुरू केले होते. ते पूर्ण झाल्याने शाहूनगरमधील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यासाठी महावितरणचे उपअभियंता कडाळे, संजय साळोखे व पालिकेचे विद्युत विभागाचे रमेश कांबळे यांच्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
....
अनेक वर्षांपासून शाहूनगरमधील वर्दळीच्या मुख्य मार्गावर मधोमध असणाऱ्या विद्युत खांबांमुळे अनेक समस्या उद्भवल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा करून आंदोलनेही केली. यासाठी ९ लाखांचा निधी मंजूर करायला भाग पाडले. रस्त्याच्या मधोमध असणारे हे खांब हटविले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून वाहतूक सुरक्षित होणार आहे.
- शंकर नाळे, शैलेश आडके, सागर मादनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02598 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..