उदगावमध्ये चोरट्याला रंगेहात पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदगावमध्ये चोरट्याला रंगेहात पकडले
उदगावमध्ये चोरट्याला रंगेहात पकडले

उदगावमध्ये चोरट्याला रंगेहात पकडले

sakal_logo
By

3071 संशयीत आरोपी रूपनर.

03069
उदगाव ः ग्रामस्थांनी संशयीत चोरट्याला पकडल्यानंतर झालेली गर्दी.

उदगावात चोरट्याला
रंगेहात पकडले
--
ग्रामस्थांकडून चोप ; पोलिसांच्या ताब्यात

जयसिंगपूर, ता. ९ : उदगाव (ता.शिरोळ) येथे भरदिवसा चोरी करणाऱ्या सांगलीच्या चोरट्यास रंगेहात पकडून ग्रामस्थांनी त्याची धुलाई केली. सोमवारी (ता.९) दुपारी बाराच्या सुमारास मुख्य महादेवी चौकात ही घटना घडली. सुनिल महादेव रूपनर (रा.गावभाग सांगली) असे संशयिताचे नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. उदगाव (ता.शिरोळ) येथील मुख्य चौकात महादेवी चौकात कन्या शाळेच्यासमोर असणार्‍या दर्शन चौगुले यांचे घराचे कुलूप फोडून घरातील कपाटातील वस्तु चोरताना घर मालकाने पकडले आणि ग्रामस्थानी बेदम धुलाई केली. संशयित रूपनर याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान घरफोडीतील चौदाशे रूपये रोख रक्कम व सात हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद दर्शन चौगुले यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. चौगुले यांच्या आई काही कामानिमित्त भोसे (ता.मिरज) येथे घराला कुलूप घालून गेल्या होत्या. दर्शनही कामानिमित्त गावात गेले होते. बाराच्या सुमारास चौगुले हे घरात आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर हा चोरटा किचन खोलीतील असलेल्या कपाट फोडून चोरी करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर चोरटा पाठीमागून दाराने बाहेर पळत आला. मुख्य चौकात ग्रामस्थ होते. अशावेळी एका घरावरून चढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पकडले. त्याच्याकडून आणखी काही चोऱ्या घडल्या आहेत का? याचा तपास केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02607 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top