
मतदार संघांची माहिती आयोगास सादर
मतदारसंघांची माहिती आयोगास सादर
शिरोळ तालुका; निवडणुकीच्या शक्यतेने ग्रामीण भाग सतर्क
जयसिंगपूर, ता. ११ : शिरोळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेचे ७ तर पंचायत समितीचे १४ मतदारसंघ आहेत. तर शासनाने १७ टक्के लोकसंख्या वाढीव धरल्याने तालुक्यात एक नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ वाढणार आहे. दुसरीकडे शिरोळ नगरपालिका झाल्याने शिरोळ जिल्हा परिषद गट हा अकिवाट म्हणून पुढे येणार आहे. शिवाय नव्याने यड्राव गटाची वाढ होणार आहे. निवडणूक आयोगाकडे माहिती सादर झाल्याने याची उत्सुकता लागून राहिली असून कोणत्याही क्षणी जि. प. निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरोळच्या ग्रामीण भागात वेग आला आहे.
शिरोळ तालुक्याची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक आहे. यामध्ये जयसिंगपूर व कुरुंदवाड अशी दोन शहरे होती. त्याचबरोबर तीन वर्षांपूर्वी शिरोळ येथे नगरपालिका झाल्याने शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघ हा रद्द होऊन याच मतदारसंघातील मोठे गाव असलेल्या अकिवाट हा जिल्हा परिषद मतदारसंघ होणार आहे. सध्या नांदणी, उदगांव, अब्दुललाट या मतदारसंघात जादा लोकसंख्या आहे. आलास, दत्तवाड, दानोळी मतदारसंघात कमी-जादा प्रमाणात लोकसंख्या आहेत.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची पुनर्रचना होऊन नवा एक जिल्हा परीषद गट नवीन होणार आहे. २०१७ मध्ये निवडणूकीपूर्वी शिरोळमधील जिल्हा परिषद मतदारसंघातील पुनर्रचना केली. यड्राव जिल्हा परिषद व चिपरी पंचायत समिती मतदारसंघ रद्द केला होता. अनेक गावांचा फेरफार होऊन, ज्या-त्या मतदारसंघात समावेश झाला होता. पुन्हा यड्राव जिल्हा परिषद गट होणार असून पुन्हा पूर्वीप्रमाणे चिपरी पंचायत समिती गण हा नांदणी जिल्हा परिषद गटात जाण्याची शक्यता आहे. शिवाय अकिवाट मतदारसंघात हेरवाड किंवा सैनिक टाकळी पंचायत समिती गण होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी प्रशासन गेले आहे. हा अहवाल घेऊन कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02608 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..