
सतरा गावांमध्ये निवडणुकीचे बिगुल
सतरा गावांमध्ये निवडणुकीचे बिगुल
शिरोळ तालुका; प्रशासनाकडून प्रभाग रचना कार्यक्रम हाती
जयसिंगपूर, ता. १० : शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मुदत संपत आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असताना या १७ गावांतही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून प्रभाग रचना कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची लगबग निवडणूक विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आहे. टाकवडे, अब्दुललाट, अकिवाट, हेरवाड, उमळवाड, संभाजीपूर, औरवाड, कवठेसार, चिंचवाड, कनवाड, हरोली, शिवनाकवाडी, राजापूर, नवे दानवाड, खिद्रापूर, लाटवाडी, राजापूरवाडी या गावांचा समावेश आहे.
यात सर्वात २५ हजार लोकसंख्या असलेले अब्दुललाट, १२ हजार लोकसंख्या असलेले अकिवाट व १० हजार लोकसंख्या असलेले टाकवडे या गावांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. तसेच ऐतिहासिक नगर असणाऱ्या खिद्रापूरचाही समावेश आहे. शिवाय इतर ग्रामपंचायती २ ते ७ हजारपर्यंत लोकसंख्या असणारी आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02609 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..