
भाजीपाला विक्रेत्यांचे उपोषण सुरू
03079
-----
भाजीपाला विक्रेत्यांचे उपोषण सुरू
जयसिंगपूर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी; मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन
जयसिंगपूर, ता. १० : पालिकेच्या सुचनेनुसार आम्ही भाजी मंडईत बसण्यासाठी तयार आहोत पण शहरातील अन्य अतिक्रमणे काढून शहर अतिक्रमणमुक्त करावे या मागणीसाठी भाजीपाला विक्रेत्यांनी क्रांती चौकात मंगळवारपासून (ता.२०) बेमुदत उपोषण सुरु केले. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे.
शहरातील गल्ली क्रमांक १० ते १३ मधील भाजीपाला बाजारावरुन संघर्ष पेटला आहे. पालिका प्रशासनाकडून भाजीपाला विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. वास्तविक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जनकपिता जयसिंग महाराज यांच्या नावे जयसिंगपूर व्यापारपेठ वसवली आहे. असे असताना शहरात किरकोळ व्यापार करुन उदरनिर्वाह चालवऱ्यांवर नगरपालिका प्रशासन अन्याय करीत आहे. भाजीपाला विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यापूर्वी शहरातील अन्य अतिक्रमणे पालिकेने काढावीत. अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजीपाला विक्रेते एकत्र आले. त्यानंतर क्रांती चौकातील जयसिंग महाराज पुतळ्यासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनात अमोल राजीगरे, अशोक जाधव, विशाल शिंगाडे, गणेश पवार, रंजना वडर, रमिजा नदाफ, महानंद गुत्तेधर, काशिबाई कांबळे, राजू पाथरवट, कल्पना कांबळे यांच्यासह विक्रेते सहभागी झाले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02611 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..