शेट्टी उद्यापासून आसाम दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेट्टी उद्यापासून आसाम दौऱ्यावर
शेट्टी उद्यापासून आसाम दौऱ्यावर

शेट्टी उद्यापासून आसाम दौऱ्यावर

sakal_logo
By

किसनराव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
सरवडेत शनिवारी विविध कार्यक्रम
सरवडे ः सरवडे (ता. राधानगरी) येथील माजी आमदार किसनराव मोरे यांच्या १४ मे रोजीच्या स्मृतिदिनानिमित्त कुस्ती मैदान, बैलगाडी शर्यत, कीर्तन, पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे संचालक विजयसिंह मोरे, आर. के. मोरे यांनी दिली. शनिवारी (ता. १४) बैलगाडी शर्यत आहे. पहिल्या चार क्रमांकांना २० हजार, १५ हजार, १० हजार, ७००० रुपयांचे बक्षीस आहे. सकाळी १० वाजता बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणे पालकमंत्री सत्तेज पाटील आहेत. अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक असणार आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबीटकर, के. पी. पाटील, संजय घाटगे, ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे, उद्योजक विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. दुपारी कुस्ती मैदान होणार आहे. आखाडापूजन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. रात्री तानाजी पाटील कोरीवडेकर यांचे कीर्तन आहे.

राजू शेट्टी आजपासून आसाम दौऱ्यावर
जयसिंगपूर : ‘एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा’च्या माध्यमातून शेतकऱ्यांत जागृतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ता. १२ ते १४ दरम्यान आसाम दौऱ्यावर जात आहेत. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम व त्रिपुरा या राज्यांतील शेतकरी प्रश्नांवर रान उठवणार आहेत. शिलाँग येथे शेतकरी प्रश्नांवर आठ राज्यांतील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून मेघालय येथील मलकी ग्राऊंड येथे पहाडी शेतकरी संघटनेतर्फे सभा व रॅली आयोजित केली आहे.

३६०९
अन्नपूर्णा भैरवनाथ पतसंस्थेला २५ लाख नफा
म्हाकवे : केनवडे (ता. कागल) येथील श्री अन्नपूर्णा भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात पंचवीस लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष साताप्पा तांबेकर यांनी दिली. संस्थापक संजय घाटगे म्हणाले, ‘‘पारदर्शी कारभार व कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे संस्था अल्पावधीतच नावारुपाला आली आहे.’’ विष्णुपंत गायकवाड यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. सचिव तानाजी कांबळे यांनी अहवालवाचन केले. पूनम चव्हाण यांनी स्वागत केले. संचालक शामराव पोवार, बाजीराव पाटील, धोंडिराम एकशिंगे, आनंदा खंडागळे, संजय चिंदगे, आनंदा दादू तळेकर, दतात्रय दंडवते, सुहास रोडे, आकाराम बचाटे उपस्थित होते. आभार प्रवीण वास्कर यांनी मानले.

रामचंद्र पाटील अध्यक्षपदी
करंजफेण ः येळवडी (ता. शाहूवाडी) येथील श्री सर्जेराव विचारे विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी रामचंद्र पाटील, तर उपाध्यक्षपदी आकूबाई अतिग्रे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ए. पी. होतेकर होते. सचिव गंगाराम पाटील, आनंदा पाटील, जगदीश पाटील, बजरंग पाटील, लक्ष्मण कांबळे, धोंडिराम अतिग्रे, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.

२४९५
सार्थक मुंढे द्वितीय
कळे : येथील आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक संपत मुंढे (पाचवी) याने केंद्रस्तरीय कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. संस्थापक-अध्यक्ष विठ्ठलराव शंकर पाटील, मुख्याध्यापक नामदेव आप्पा नांदवडेकर यांचे प्रोत्साहन, तर शिक्षक व आई रंजना, वडील संपत मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले.

01285
सचिन पाटील अध्यक्षपदी
तुरुकवाडी : सोंडोली (ता. शाहूवाडी) येथील श्री केदार्लिंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सचिन पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा सत्कार संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भीमराव पाटील यांच्या हस्ते झाला. उपसरपंच अण्णासो पाटील, संपत पाटील, माजी उपाध्यक्ष दिलीप कुंभार, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, गोरक्ष पाटील, शिवाजी चोपडे, शिवराम म्होळे, भगवान पाटील, बाळू म्होळे, बाळासो पाटील, गोरख चोपडे, शिवाजी सावंत, कमलेश पाटील, नानासो पाटील, मारुती पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

बाबूराव पायमल यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
बोरपाडळे : येथील प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ अध्यापक बाबूराव पायमल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांच्या हस्ते सत्कार झाला. अध्यक्षस्थानी श्रीरंग वारके होते. गटशिक्षणाधिकारी मानकर यांनी भाषण केले. अनिल मोरे यांनी प्रास्ताविकात पायमल यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. राजर्षी शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष बबन केकरे, आनंदराव घाटगे, विद्या पाटील, के. एस. पाटील, माधुरी खोत, मल्हारी सावंत, उत्तम मोरे, माणिक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सातवे, पैजारवाडी, कोडोली, पन्हाळा केंद्रातील शिक्षकांची उपस्थिती होती. संजय नलवडे यांनी आभार मानले.

२७३८
मोघर्डे उपसरपंचपदी मनीषा पाटील
सोळांकूर : मोघर्डे (ता. राधानगरी) येथील उपसरपंचपदी मनीषा युवराज पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीवेळी सरपंच संतोष गुरव, उपसरपंच अस्मिता पाटील, ग्रामसेविका गीता पाटील, संभाजी पाटील, शामराव पाटील, विठ्ठल पाटील, कृष्णा बेलेकर, माजी सरपंच के. जी. पाटील, विलास पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील उपस्थित होते. कृष्णा बेलेकर यांनी आभार मानले.

02946
02947
‘बलभीम’च्या अध्यक्षपदी विश्‍वनाथ पाटील
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी ‘भोगावती’चे संचालक विश्वनाथ विठ्ठल पाटील व उपाध्यक्षपदी पांडुरंग गुंडू पाटील यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक श्री. शेख होते. संचालक मंडळ असे : अशोक पाटील, तानाजी पाटील, सज्जन पाटील, उत्तम पाटील, बाजीराव कुपले, सुहास पाटील, शिवाजी सारंग, शंकर कांबळे, संजय लोहार दीपा पाटील व छाया पाटील.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02614 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top