जयसिंगपूरला भाजी विक्रेत्यांचे उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरला भाजी विक्रेत्यांचे उपोषण मागे
जयसिंगपूरला भाजी विक्रेत्यांचे उपोषण मागे

जयसिंगपूरला भाजी विक्रेत्यांचे उपोषण मागे

sakal_logo
By

03088

---
भाजी विक्रेत्यांचे उपोषण मागे
तात्पुरती व्यवस्था करण्याचे जयसिंगपूर पालिकेचे आश्वासन
जयसिंगपूर, ता.१२ : शहरातील आठव्या गल्लीत भाजी विक्रेत्यांची तात्पुरती व्यवस्था करण्याचे लेखी आश्वासन पालिकेने दिले. त्यानंतर विक्रेत्यांनी सुरु केलेले उपोषण मागे घेतले. माजी नगरसेवक पराग पाटील यांची मध्यस्थी सफल ठरली. प्रशासन व विक्रेते यांच्यातील बैठकीत तोडगा निघाला.
शहरातील अतिक्रमण हटवल्याशिवाय भाजी मंडईत स्थलांतर करणार नाही, अशी भूमिका घेत भाजी विक्रेत्यांनी क्रांती चौकात बेमुदत उपोषण सुरु केले होते. शहरातील अन्य अतिक्रमणे काढून शहर अतिक्रमणमुक्त करावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती.
भाजी विक्रेत्यांनी एकत्र येवून शहरातील प्रमुख मार्गावरुन गुरुवारी दुपारी तिरडी मोर्चा काढला. विक्रेत्यांच्या मागणीबाबत मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजी विक्रेते, माजी नगरसेवक पराग पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, वैभव उगळे, चंद्रकांत जाधव, तेजस कुराडे यांच्यात बैठक झाली.
भाजी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंत वैरण बाजार येथे नगरपालिकेच्या रिकाम्या जागेत तात्पुरती व्यवस्था केली आहे असे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर तीन दिवस सुरु असलेले उपोषण मागे घेतले. पराग पाटील यांच्याहस्ते सरबत घेऊन आंदोलकांनी उपोषण सोडले. यावेळी विक्रेते अमोल राजिगिरे, अशोक जाधव, विशाल शिंगाडे, गणेश पोवार, राजू पाथरवट उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02619 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top