महापुराचा लेखाजोखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापुराचा लेखाजोखा
महापुराचा लेखाजोखा

महापुराचा लेखाजोखा

sakal_logo
By

महापुराचा लेखाजोखा
शिरोळ तालुका
--------------

४८ कोटी ४३ लाखांवर मदत
-
महापुराच्या भीतीचे ढग लागले जमू

गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २० : महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात पावसाळा जवळ येईल तसे महापुराच्या भीतीचे ढग जमू लागले आहेत. गतवर्षी आलेल्या महापुरात शेती पिकांसह घरे, दुकाने, जनावरांचे गोठे, कुकुटपालन शेड, ग्रीन हाऊससह महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षी ८४ हजार २९६ बाधितांना तब्बल ४८ कोटी ४३ लाख ८ हजार १८४ रुपयांची मदत शासनाने दिली आहे. प्रारंभी मदतीच्या निकषातील अटींमुळे मदतीपासून वंचित राहिल्याचे आरोप करत प्रशासनाविरोधात आंदोलने झाली. सध्या प्रशासन संभाव्य पुराशी सामना करण्यासाठी सज्ज असताना मदतीची मागणी मागे पडली आहे.
महापुरात प्रमुख ऊस पिकासह अन्य पिके, भाजीपाला यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. पुराच्या काळात साथीच्या आजारांचे थैमान माजते. आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडतो. शिवाय गणेशोत्सवासह इतर सणांवरही परिणाम जाणवतात. उत्सवावर आधारित असणाऱ्या घटकांना आर्थिक झळ बसते. महापुरानंतर ट्रान्स्फॉर्मर जळणे, विद्युत पोल कोसळणे असे प्रकार घडल्याने दुरुस्तीच्या कामाला सहा-सहा महिने लागतात. त्यामुळे पावसाळ्यात महापुराने, तर उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके करपून शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

चौकट
पुनर्वसनाचे भिजत घोंगडे
तालुक्यातील बाधित कुटुंबीयांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यात प्रबोधन केले; मात्र जे लोक यासाठी तयार झाले त्यांचे अद्याप स्थलांतर झाले नाही.
....

ठळक चौकट

सानुग्रह अनुदान
लाभार्थी ः १८६८१
अनुदान वाटप ः १८ कोटी ७० लाख.
--
मृत जनावरे ः २४
अनुदान वाटप ः २ लाख ८८ हजार.
--
घर, गोठा पडझड ः १५१५
अनुदान वाटप ः ६५ लाख १७ हजार.
--
लघुउद्योग ः ३१०६
अनुदान वाटप ः १ कोटी ९६ लाख ३४ हजार.
--
शेती पिके ः ६०८७१
अनुदान वाटप ः २६ कोटी २८ लाख ९८ हजार २९१.
....
कोट
महापुरामुळे बाधितांना मदत देण्यासाठी पारदर्शी प्रक्रिया राबवली आहे. महापुराच्या कठीण काळात शासन मदतीला कुठेही कमी पडले नाही. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर शासन सज्ज आहे.
-डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार, शिरोळ.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02630 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top