
जयसिंगपूरमध्ये शुक्रवारपासून कृषी प्रदर्शन
जयसिंगपूरमध्ये शुक्रवारपासून कृषी प्रदर्शन
जयसिंगपूर, ता. १८ : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व डॉक्टर अंकल जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २४ मे या काळात हे प्रदर्शन होणार असल्याची माहिती, बाजार समितीचे सभापती सुभाषसिंग रजपूत व डॉक्टर अंकलचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते, तर दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
प्रदर्शनात शेतातील बदलणारे तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे, पाण्याचे नियोजन, सेंद्रिय खतांचे महत्त्व, बियाणांच्या विविध जाती, सौरऊर्जेचे महत्त्व तसेच शासनाच्या शेतीविषयक वेगवेगळ्या योजना, सेवांची परिपूर्ण माहिती दिली जाणार आहे. तसेच दीडशेहून अधिक स्टॉल, शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सेमिनार, कृषी कर्जबाबतची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, स्थानिक ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना विशेष स्टॉल उपलब्ध असणार आहेत. उपसभापती मोहम्मदशफी पटेल, संचालक विजयसिंह माने देशमुख, आप्पासो भोसले, अशोक पाटील, संजय पाटील, बाबासो भोकरे, संदीप पवार उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02634 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..