आश्वासनानंतर आंदोलन मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्वासनानंतर आंदोलन मागे
आश्वासनानंतर आंदोलन मागे

आश्वासनानंतर आंदोलन मागे

sakal_logo
By

आश्‍वासनानंतर रास्ता रोको मागे
जयसिंगपूर : रस्ता दहा जूनपर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर निमशिरगाव ग्रामस्थांचे गुरुवारी (ता. १९) होणारे रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील चिपरी मार्गावर असलेल्या गेट क्रमांक नऊ अचानकपणे बंद केल्याने मंगळवारी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला घेराओ घालून धारेवर धरले होते. शिवाय हा गेट खुला करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी रास्ता रोको करण्यात येणार होता. तत्पूर्वी रेल्वे प्रशासन व निमशिरगाव ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. दहा जूनपर्यंत सर्व रस्ता पूर्ण करून देण्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन मागे घेतले. मिरज विभागाचे असिस्टंट डिव्हीजन इंजिनिअर रामकिशोरसिंग यादव यांना रेल्वे यांनी दहा जूनपर्यंत निमशिरगावला जाणारा पर्यायी रस्ता करून देऊ, असे लेखी पत्र दिल्यानंतर हे ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. शैलेश गुरव, शांताराम पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02643 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top