
जयसिंगपूरला वाहतूक विस्कळीत
जयसिंगपूर - ढगांच्या कडकडाटासह गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जयसिंगपूर येथील शाहूनगर, उदगांव, कुरूंदवाड येथील आठवडी बाजाराची दैना उडाली. साडे पाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने पावसाला सुरूवात झाली. कोथळी, उदगांव, चिंचवाड, गणेशवाडी, शेडशाळ, कुरूंदवाड, शिरोळ येथील वीट भट्टी व्यावसायिकांना पावसाचा फटका बसला. तमदलगे, निमशिरगाव, चिपरी, जैनापूर, कोंडीग्रे, यड्राव, जांभळी आदी माळभागावर असलेल्या ऊसासह भाजीपाल्याला पुरेसा पाऊस झाल्याने शेती भिजून चिंब झाली होती. शहरात काही ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
कुरुंदवाडला झोडपले
कुरुंदवाड - शहर व परिसराला आज पावसाने तासभर अक्षरशः झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, शेडशाळ, गणेशवाडी परिसरातही जोरदार पाऊस झाला. आजच्या पावसामुळे आठवडी बाजारातील भाजीपाला व अन्य फिरस्त्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे सोयाबीनची मळणी खोळंबली शिवाय सोयाबीनला फटका बसला.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02645 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..