‘घोडावत’मध्ये बॅचलर ऑफ डिझाईन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘घोडावत’मध्ये  बॅचलर ऑफ डिझाईन सुरू
‘घोडावत’मध्ये बॅचलर ऑफ डिझाईन सुरू

‘घोडावत’मध्ये बॅचलर ऑफ डिझाईन सुरू

sakal_logo
By

‘घोडावत’मध्ये बॅचलर ऑफ डिझाईन सुरू
---
विनायक भोसले; चार वर्षांचा अभ्यासक्रम, प्रवेश घेण्याचे आवाहन
जयसिंगपूर, ता. २२ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठात सकूल ऑफ डिझाईन ॲण्ड आर्किटेक्चर अंतर्गत बॅचलर ऑफ डिझाईन हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून सुरू केला आहे. अभ्यासक्रमांतर्गत स्पेस (इंटेरियर) डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, ग्राफिक डिझाईन व फॅशन डिझाईन हे चार विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण पाटील म्हणाले, की हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचे व्यवसायात रूपांतर करून देणारी ही विद्याशाखा आहे. या अभ्यासक्रमाची शिक्षण पद्धती ही प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर आधारित असून, २० टक्के थेअरी व ८० टक्के प्रात्यक्षिक अशा स्वरूपाची आहे. या पदवीचा अभ्यासक्रम हा डिझाईन क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला.
मार्गदर्शन करणारे शिक्षक हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी आहेत. प्रात्यक्षिकांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा व स्टुडिओ उपलब्ध आहे. विविध डिझाईनची प्रात्यक्षिके, वर्कशॉप, स्टुडिओ व प्रोजेक्ट या माध्यमातून केले जातात. या अभ्यासक्रमांतर्गत नॅशनल व इंटरनॅशनल इंटरशिप करणे अंतर्भूत आहे. तसेच, विद्यापीठाने विविध शैक्षणिक संस्था व इंडस्ट्रीज यांच्याबरोबर शैक्षणिक करार केले आहेत. या अंतर्गत टीसाईड युनिव्हर्सिटी- यूके व ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी- न्यूझीलंड यांच्याशी शैक्षणिक करार केलेले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी विद्यापीठाकडून मार्गदर्शन व सहाय्य केले जाते, अशी माहिती विद्यापीठाचे विश्वस्त श्री. भोसले यांनी दिली.
नव्याने सुरू केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, ॲकॅडमिक डीन डॉ. यू. पी. जाधव, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डीन डॉ. ए. डी. सावंत, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, विभागप्रमुख सौ. तोरस्कर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02652 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top