‘सकाळ’च्या मोहिमेला वाढतेय पाठबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सकाळ’च्या मोहिमेला वाढतेय पाठबळ
‘सकाळ’च्या मोहिमेला वाढतेय पाठबळ

‘सकाळ’च्या मोहिमेला वाढतेय पाठबळ

sakal_logo
By

‘सकाळ’च्या मोहिमेला वाढतेय पाठबळ
मानवी साखळीत सहभागाचा पूरबाधित गावांमधून निर्धार; महापुरातून मुक्ततेची आशा
जयसिंगपूर, ता. २९ : महापूर शेतकऱ्यांसह सर्वच घटकांसाठी डोकेदुखी बनला आहे. २००५ पासून सातत्याने महापुरावर नियंत्रणासाठी समित्या स्थापन करणे, अहवाल मागवणे, महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय साधणे अशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्या, तरी प्रत्यक्षात सकारात्मक आणि ठोस कृती होत नसल्यामुळे महापूर पाचवीला पूजला आहे. महापुराच्या जोखडातून पूरग्रस्तांची मुक्तता करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने हाती घेतलेल्या मोहिमेला पाठबळ देण्याचा निर्धार पूरबाधित गावांतून व्यक्त होत असून, शुक्रवारी (ता. ३) होणाऱ्या मानवी साखळीच्या उपक्रमातही सहभागी होण्याचे ठरविले आहे.
महापुराने नदीकाठावर पंधरा वर्षांपासून थैमान घातले आहे. महापुरानंतर शासन पातळीवर पंचनामे, नुकसान भरपाईसाठी आंदोलने होत आहेत. चुकीचे पंचनामे, अपात्र लाभार्थी यामुळे मदत कार्यात पारदर्शकता दिसत नाही, असाही सूर बाधित गावातील लोकांचा आहे. पूरग्रस्त आणि प्रशासन यांच्यात यावरून वादाची ठिणगी पडते. नंतरच्या काळात पक्ष आणि संघटनांकडून याविरोधात आंदोलनाचा पूर येतो. मात्र, पाचवीला पूजलेला हा महापूर येऊ नये, यासाठी शासन पातळीवर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे आणखी किती काळ महापूर आणि यानंतरचे नुकसान पूरबाधित गावांनी सोसायचे, असा हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे दानशूरांची संख्याही कमी होत आहे. शासनाचा निधी तोकडा पडत आहे. अशा स्थितीत महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची आहे. अन्यथा येणाऱ्या काळात शिरोळ तालुक्यातील जवळपास सत्तर टक्के गावे महापुराने उद्‍ध्वस्त होणार आहेत. दरवर्षी उपाययोजनेचे तुणतुणे वाजवतात; पण आता शासनाने याप्रश्नी ठोस कार्यवाही हाती घेणे गरजेचे आहे. पावसाळा तोंडावर असल्याने शासनाने धरणातील पाणीसाठा, पावसाचा अंदाज, नदी पात्रातील अतिक्रमणे यांचा सारासार विचार करून उपाययोजना करून महापुरापासून दिलासा देण्याची मागणी पूरबाधित गावांमधून होत आहे.
....

महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना हा एकच पर्याय आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीतील पिकांचा चिखल होतो. यानंतर मदतीचे आणि पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवले जाते. यात पात्र लाभार्थी बाजूला आणि अपात्र लोकांचाच भरणा अधिक दिसतो. यापुढे हे चालू द्यायचे नसेल, तर महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना गरजेच्या आहेत.
-विजय भोजे,
माजी जिल्हा परिषद सदस्य, अब्दुललाट
....

महापुराच्या विषयावर शासनाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे. दरवर्षी पावसाळ्याआधी आपत्ती व्यवस्थापनावर कार्य केले जाते. मात्र, आपत्ती येऊ नये, यासाठी कृती होताना दिसत नाही. काही वर्षांपासून शिरोळ तालुक्याला महापुराची वक्रदृष्टी लागली आहे. सधन असणाऱ्या तालुक्याला महापुराचा शाप लागला असून, शासनाने सकारात्मक दृष्टीने काम करून तालुक्याला या दुष्टचक्रातून वाचवावे.
- शेखर पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्य धरणगुत्ती

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02678 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top