पुनर्वसन नको; पूर निवारण हवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्वसन नको; पूर निवारण हवे
पुनर्वसन नको; पूर निवारण हवे

पुनर्वसन नको; पूर निवारण हवे

sakal_logo
By

पुनर्वसन नको; पूर निवारण हवे
दहा गावांमधून सूर; ‘जखम मांडीला आणि मलम शेंडीला’ अशी स्थिती

गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३१ : शिरोळ तालुक्यातील १० पूरग्रस्त गावांमधून स्थलांतराला विरोध होत आहे. तालुक्यातील ४३ गावांचे पुनर्वसन करणार आहे का? गावठाण शिल्लक आहेच कुठे? ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्रशासन समर्पक उत्तरे का देत नाही? पुनर्वसन हा उपाय नाही. गाव, शेती, घरे सोडून कुठेही जाणार नसल्याची ठाम मानसिकता या गावांतील लोकांची आहे. ‘जखम मांडीला आणि मलम शेंडीला’ अशी स्थिती पुनर्वसन गावांच्या बाबतीत झाली आहे. शासनाने गावेच्या गावे स्थलांतरित करण्यापेक्षा महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असा सूर नदीकाठच्या गावांमध्ये उमटू लागला आहे.
शासनाने तालुक्यातील ४३ पैकी १० गावांच्या पुनर्वसनासाठी कंबर कसली आहे. गतवर्षी महसूलच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी गावांमध्ये मॅरेथॉन बैठकांचा धडाका लावला होता. यासाठी जिल्ह्यातील विविध महसूल अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन प्रशासनाने आपली बाजू नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला होता. महापुरातील शेती आणि घरांचे नुकसान यावरच लक्ष केंद्रित करून ग्रामस्थांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पुनर्वसन करताना अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले. त्यापुढे अधिकारी हतबल झाले. गाव तर सोडणारच नाही, अशी मानसिकता या गावातील ग्रामस्थांची आहे. त्यामुळे गावे स्थलांतर करण्यापेक्षा शासनाने महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करून पूरग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
....


पुनर्वसनातील गावे
खिद्रापूर, राजापूरवाडी, राजापूर, हसूर,
कुटवाड, बस्तवाड, कनवाड, घालवाड, शिरटी या गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. कुरुंदवाड आणि शिरोळमधील पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी दुसऱ्या टप्प्यात प्रयत्न केले जाणार आहेत.
....

शासनाने गावे पुनर्वसनाचा अट्टहास सोडून पावसाळ्यात पाण्याचे नियोजन करावे. पिढ्यान्‌पिढ्या ज्या गावात वाढलो, ज्या ठिकाणी शेती आहे तेथून विस्थापित होणार नाही. त्यामुळे पुनर्वसन यापेक्षा उपाययोजना राबवाव्यात.

- बाबासाहेब आरसगोंडा (सरपंच कनवाड)

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02699 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top