अपघात साईड स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात साईड स्टोरी
अपघात साईड स्टोरी

अपघात साईड स्टोरी

sakal_logo
By

तो निरोप अखेरचाच!
जयसिंगपूर : आम्ही कऱ्हाडजवळ आलोय; तासाभरात घरात येतोय, असा मोबाईलवर दुपारी दोन वाजता निरोप दिला अन् अडीच वाजता अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. जयसिंगपूरजवळील मौजे आगर (ता. शिरोळ) येथील शिरोटे कुटुंबासाठी मोबाईलवरील हा संदेश आयुष्यभरची दुःखद आठवून देणारा ठरला. या अपघातात तीन कोवळी मुले जग पाहण्याआधी काळाच्या पडद्याआड गेली.
निवृत्त मुख्याध्यापक असलेले ए. डी. शिरोटे यांना दोन मुली आणि दोन मुलगे आहेत. अभिनंदन व अरिंजय दोघे भाऊ. अभिनंदन यांचा येथील पार्वती इंडस्ट्रीजमध्ये टेक्‍स्‍टाईलचा व्यवसाय आहे. अरिंजय पुण्यामध्ये मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. कामानिमित्त ते गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनंदन पत्नी व मुलांना घेऊन अरिंजय यांच्याकडे सुटीला पिंपरी चिंचवडला गेले. मुलांना सोडून ते गावी परत आले.
दोनच दिवसांपूर्वी ते पुन्हा धान्य घेऊन अरिंजय यांच्याकडे गेले. अरिंजय यांनी दोन दिवसांनी मी त्यांना सोडायला येतो, तू पुढे जा, असे सांगितले. यामुळे अभिनंदन परत जयसिंगपूरला एकटेच आले. आज सकाळी अकरा वाजता सर्व जण अरिंजय यांच्यासह पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे यायला निघाले. दुपारी दोन वाजता अभिनंदन यांनी संपर्क केल्यानंतर आम्ही कऱ्हाडमध्ये आलो आहोत, असे सांगितले आणि पुढच्या दोन तासातच हृदयद्रावक अपघाताची बातमी कुटुंबीयांना समजली.
अपघातात अभिनंदन यांचे सगळे कुटुंबच संपले. अरिंजय यांच्या मृत्यूने त्यांची पत्नी व दोन मुले पोरकी झाली. शैक्षणिक व व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिरोटे कुटुंबीयावर डोंगर कोसळला आहे. अपघाताची घटना कळताच जयसिंगपूरसह कोथळी गावावरवर शोककळा पसरली. हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाचा हा अनपेक्षित घाला बसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02723 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top