घोडावत विद्यापीठात अनेका क्लाऊड लॅब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडावत विद्यापीठात अनेका क्लाऊड लॅब
घोडावत विद्यापीठात अनेका क्लाऊड लॅब

घोडावत विद्यापीठात अनेका क्लाऊड लॅब

sakal_logo
By

03370
----------
घोडावत विद्यापीठात अनेका क्लाऊड लॅब
जयसिंगपूर, ता.२१: अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापिठाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामार्फत आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापिठाच्या मंजरासॉफ्ट या स्पिन-ऑफ कंपनीच्या सहकार्याने संजय घोडावत विद्यापीठात ‘अनेका क्लाऊड लॅब’ सुरु केली. याचे उद्‍घाटन विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांच्याहस्ते केले. कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ. उत्तम जाधव, प्रा. दीपिका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. युनिव्हर्सिटी ऑफ टार्टू, एस्टोनियाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे संशोधक शिवानंद पुजारा यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनेका क्लाउड लॅबवर प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित केले. कुलगुरू प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी एसजीयु आणि एसजीयु बाहेरील विद्यार्थ्यांना या सहयोग उपक्रमाद्वारे सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करणार असल्याचे जाहीर केले.
विश्वस्त विनायक भोसले यांनी भविष्यात ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाच्या सहकार्याने क्लाउडसह स्टँडअलोन डिग्री स्पेशलायझेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02795 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top