साहित्याची मोडतोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्याची मोडतोड
साहित्याची मोडतोड

साहित्याची मोडतोड

sakal_logo
By

00682
खामकरवाडीच्या वळणावर
टेंपो उलटून एक जण जखमी

धामोड : म्हासुर्ली-धामोड (ता. राधानगरी) मार्गावर खामकरवाडी येथे तीव्र घाट वळणावर टेंपो उलटून एक गंभीर जखमी झाला. अनिल बाळू जाधव (वय ३५ बालिंगे ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. पाचजण किरकोळ जखमी झाले. आज सांयकाळी सहा वाजता ही घटना घडली. याबाबतची माहिती अशी, खामकरवाडी येथील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेंपो (एमएच १२ एलटी १७५०) उलटला. वळणावर संरक्षक कठडा असल्याने पुढील अनर्थ टळला. यात अनिल जाधव गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धामोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमचार करून शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

खुनातील संशयितांना १ जुलैपर्यंत कोठडी
कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून साळोखेनगरातील तरुणाचा निघृण खून केल्याचा प्रकार काल उघडकीस आला. संकेत पाटील असे मयत तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. त्या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना १ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शिवराज ऊर्फ दाद्या चंद्रकांत बंडगर, प्रतिक विजय कांबळे, रोहित नामदेव कांबळे अशी त्या तिघा संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रेमविवाहाच्या रागातून तोडफोड
जयसिंगपूर : प्रेम विवाह केल्याच्या रागातून बंद घरातील टीव्ही, फ्रीज, खिडक्या यांसह घरातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरात घडली. या प्रकरणी सवित्री दिलीप कलगुटगी, दिलीप कलगुटगी, अनिकेत दिलीप कलगुटगी व मोठा भाऊ (नाव माहिती नाही, सर्व रा. मिरज जि. सांगली) व मंगल चव्हाण, रोहन चव्हाण दोघे (रा. शाहूनगर जयसिंगपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद वैशाली प्रकाश पवार (जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.

१६६३
आंबा घाटात टेंपोचा अपघात
आंबा ः आंबा घाटात प्रवासी टेंपो खोल दरीत कोसळता कोसळता वाचली. दाट धुक्यात चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. रविवारी रात्री दहा वाजता आंबा घाटातल्या गायमुखाजवळ अपघात झाला. अपघाताची नोंद साखरपा पोलिसांत झालेली नाही. घाटात संरक्षक कठड्यावरच लटकली. दैव बलवत्तर म्हणून टेंपोतील सतरा प्रवासी बचावले. टेंपोची डावी बाजू कठडा तोडून पुढील बाजू दरीकडे झुकली आणि दरीच्या काठावर लटकली. प्रसंगावधान राखून सतरा प्रवासी बाहेर पडले.
घाटातील बांधकामावरील जेसीबीने टेंपो बाहेर काढला. सृष्टी टूर अँड ट्रॅव्हल्सचा टेंपो (एमएच ४६ बीएफ ७४२७) कर्जतहून कोल्हापूरमार्गे गणपतीपुळ्याला निघाली होती. जेसीबी चालक अशोक जाधव यांचे योगदान लाभले.


झाडावरून पडून जखमींचा मृत्यू
कोल्हापूर ः मेढेवाडी (ता. आजरा) येथे फणस काढत असताना झाडावरून पडून जखमी झालेल्या तरुणाचा सीपीआरमध्ये आज मृत्यू झाला. मारुती महादेव दळवी (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. ही घटना २१ जून रोजी सकाळी मेढेवाडी गावात घडली होती. त्यांना गडहिंग्लज येथील रुग्णालयातून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.


इचलकरंजीत एकास मारहाण
इचलकरंजी : सिमेंटचा कोबा फोडल्याचा जाब विचारल्याने दोन कुटुंबात वाद झाला. या वादातून दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अरविंद कोकरे आणि सुनीता अरविंद कोकरे (रा. तोरणानगर) या दोघांच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02816 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top