उत्तम यशासाठी अभ्यास आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तम यशासाठी अभ्यास आवश्यक
उत्तम यशासाठी अभ्यास आवश्यक

उत्तम यशासाठी अभ्यास आवश्यक

sakal_logo
By

03405

----
उत्तम यशासाठी अभ्यास आवश्यक
डॉ. महावीर अक्कोळे; जयसिंगपूर महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
जयसिंगपूर, ता. २७ : येथील जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य सौ. एम. एस. पाटील यांनी केले. मान्यवरांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी स्थानिक समिती सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्तम यशासाठी अभ्यास केला पाहिजे. त्याला पर्याय नाही. आयुष्यात येणाऱ्या संधी ओळखता आल्या पाहिजेत, असे डॉ. अक्कोळे यांनी सांगितले. प्राचार्या सौ. एम. व्ही. काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. 
कला शाखेमध्ये अनुक्रमे मुजाहिद मुल्ला (८०.५० टक्के), करिष्मा यादव (७३.५०), अर्पिता जाधव (७०.८३). वाणिज्य शाखेमध्ये अनुक्रमे प्राजक्ता पाटील (८६.६७ टक्के), सिद्धी घराळ (८५.६७), रोहित खोत (८३.८३), विज्ञान शाखेमध्ये अनुक्रमे श्रेया जाधव (८४.३३ टक्के), जयराम पवार (८३.८३), साहिल चौगुले (८३). विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. अडदंडे तसेच संस्थेचे पदाधिकारी आप्पासाहेब भगाटे, बाळासाहेब इंगळे, आदिनाथ नरदे, अशोक शिरगुप्पे यांचे मार्गदर्शन लाभले. मराठी विभाग प्रमुख डॉ. एन. पी. सावंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनील चौगुले यांनी केले. आभार पर्यवेक्षक बी. ए. आलदर यांनी मानले. प्रसिध्दी विभागाचे कामकाज सौ. अंजना चावरे यांनी पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02818 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..