
मोर्चा प्रकरणी ८८ जणांवर गुन्हा
चौकट
८८ जणांवर गुन्हा दाखल
विनापरवाना जमाव जमविणे, मोर्चा काढणे आणि घोषणाबाजीप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी शिवसेना आणि यड्रावकर गटाच्या ८८ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (रा. हुपरी), उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील (सैनिक टाकळी), स्वाती सासणे (उदगाव), वैभव उगळे (कुरुंदवाड), तेजस कुराडे (जयसिंगपूर), बाबासाहेब सावगावे (कुरुंदवाड), सतीश मलमे (दानोळी), सतीश पवार, आकाश शिंगाडे, राजेंद्र पाटील, प्रतीक धनवडे (नृसिंहवाडी), मलकारी लवटे (इचलकरंजी), अर्जुन जाधव, पिंटू मुधाळे (हुपरी), मनीषा पवार (संभाजीपूर), साजिदा घोरी (जयसिंगपूर), सयाजी चव्हाण व भारत पवार (इचलकरंजी) यांच्यासह ४३ जणांचा समावेश आहे. याबाबातची फिर्याद पोलिस विजय बाबूराव पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
यड्रावकर गटाचे संजय पाटील-यड्रावकर, संभाजी मोरे (जयसिंगपूर), दरशथ काळे (अब्दुललाट), राजकुमार पाटील, सागर माने, गुंडाप्पा पवार, विनायक गायकवाड, गणेश चौगुले, बबलू रसाळ, विजय मोरे, प्रकाश लठ्ठे, राजेश चुडाप्पा, बंडू भवरे, प्रकाश पवार, अमृत तावदारे यांच्यासह ३० जणांवर गुन्हे दाखल झाले. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल संदेश शेटे यांनी दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02820 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..