तीन हजाराहून अधिक हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन हजाराहून अधिक हरकती
तीन हजाराहून अधिक हरकती

तीन हजाराहून अधिक हरकती

sakal_logo
By

जयसिंगपुरात हरकतींचा पाऊस
नगरपालिका निवडणूक; प्रारूप मतदार यादीवर तब्बल ३ हजारांवर हरकती

जयसिंगपूर, ता. २६ : येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (ता. २१) प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत दोन प्रभागांच्या सीमेवरील अनेकांचे मतदान या प्रभागातून त्या प्रभागात झाले आहे. त्यामुळे रहिवास असलेल्या प्रभागातच मतदान हवे यासाठी मतदान याद्या दुरुस्तीसाठी तब्बल ३ हजारांवर हरकती दाखल झाल्या आहेत. ३० जूनपर्यंत नगरपालिकेकडून मतदार याद्या दुरुस्त करून १ जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महिनाभरापासून पालिका निवडणुकीच्या निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडत, प्रभाग रचनेचे काम पूर्ण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदान याद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे. शहरात १३ प्रभाग असून, यात ४५ हजार ६३ मतदान निश्चित झाले आहेत. मंगळवार (ता. २१) पालिकेने याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. यावर २१ ते २७ जूनपर्यंत या प्रारूप मतदान यादीवर सूचना व हरकती मागविल्या. यात १ हजारहून अधिक जणांनी हरकती दाखल करून ३ हजारांवर दुरुस्त्या सुचविल्या आहेत. त्यामुळे या मतदान याद्या दुरुस्तीसाठी हरकतींचा पालिकेवर पाऊस पडला आहे.
पालिकेचे कर्मचारी प्रभागनिहाय हरकती असलेल्या नागरिकांची भेट घेऊन मतदार यादीतील दुरुस्ती करीत आहेत. शिवाय आलेल्या हरकतीवर निपटारा करण्यासाठी ३० जूनपर्यंत पालिकेकडे अवधी आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्वच विभागांना प्रभागनिहाय आलेल्या हरकतींवर दुरुस्ती करण्याचे काम सोपवले आहे.


इच्छुकांचा हस्तक्षेप
इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, आघाड्यांची मोर्चेबांधणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून एका व्यक्तीच्या नावावर पालिकेकडे अर्ज केला आहे. यात तब्बल २०० ते २५० हरकती घेतल्या असून, यांचे नाव या प्रभागातून या प्रभागात घाला, असे मत मांडले आहे. शिवाय मर्जीतील नागरिकांची मते दुसऱ्या प्रभागात जाऊ नयेत यासाठीही इच्छुकांनी मतदारांना जागृत करून हरकती देण्यास लावले आहे. त्यामुळे पालिकेत एका अर्जात २५० हरकती आल्याचे समोर आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02823 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..