दोन टप्प्यात एफआरपी साखर संघास चपराक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन टप्प्यात एफआरपी साखर संघास चपराक
दोन टप्प्यात एफआरपी साखर संघास चपराक

दोन टप्प्यात एफआरपी साखर संघास चपराक

sakal_logo
By

राज्य साखर संघास चपराक
दोन टप्प्यात एफआरपी; हस्तक्षेप याचिका दाखल करून घेण्यास नकार
जयसिंगपूर, ता. २ : उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राजू शेट्टी यांच्यासह १० शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकेवर राज्य साखर संघाचे म्हणणे ऐकून घेऊन मगच निर्णय द्यावा, अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला असता उच्च न्यायालयाने मागणीस स्थगिती देऊन राज्य साखर संघास चपराक दिली. साखर संघाच्या भूमिकेने ऊस उत्पादकांच्या ताटात माती कालविण्याचे काम केल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या एफआरपीच्या कायद्यात तोडमोड करून एफआरपी दोन टप्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात राजू शेट्टी व इतर दहा शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली. याचिकेवर काल न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता खंडपीठाने याचिकेवर केंद्र व राज्य सरकार यांना तीन आठवड्यात उत्तर देण्याबाबत निर्देश दिले आहेत.
दरम्यान याचिकेत राज्य साखर संघाने हस्तक्षेप याचिका दाखल करत एफआरपी दोन टप्यात देणे कसे योग्य आहे, हे सांगण्यासाठी याचिकेत सहभागी करुन घेण्याबाबत विनंती केली असता याचिकाकर्ते राजू शेट्टी यांच्या वतीने त्यांचे वकील ॲड. योगेश पांडे यांनी विरोध केल्याने हस्तक्षेप याचिका प्रलंबित ठेवली आहे. परिपत्रकास स्थगिती देण्याची विनंती याचिकाकर्ते यांच्या वतीने केली असता खंडपीठाने शासनाचे म्हणणे आल्यावर याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने ऊस दर नियंत्रण समिती दुबळी केली एफआरपी दोन टप्यात करून ऊस उत्पादकांचा विश्वासघात केला. पूरग्रस्त शेतकऱ्यांना फसविले असताना शेतकरी न्याय मागत असताना साखर संघ यात हस्तक्षेप करत आहे. परिपत्रकाच्या अंमलबजावणीमुळे ऊस उत्पादकास पहिला हप्ता देताना कारखाने मनमानीरित्या कपात करण्याचा धोका असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या या धोरणाविरुद्ध रस्त्यावर व न्यायालयात जोरदार लढा दिला जाईल. ज्या महाविकास आघाडी सरकारने व राज्य साखर संघाने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली त्यांना धडा शिकवल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत, असेही शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02840 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top