२५ शाळांमध्ये शौचालय प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२५ शाळांमध्ये शौचालय प्रस्ताव
२५ शाळांमध्ये शौचालय प्रस्ताव

२५ शाळांमध्ये शौचालय प्रस्ताव

sakal_logo
By

२५ शाळांत २०४ शौचालयांचा प्रस्ताव
---
शिरोळ पंचायत समितीकडून जिल्हा प्रशासनास सादर
जयसिंगपूर, ता. ६ : आपत्तीत निवारा केंद्रांमध्ये पूरग्रस्तांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने जेथे महापूर येत नाही व पूरग्रस्तांच्या निवारा केंद्रांची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. २५ शाळांमधून जवळपास २०४ शौचालये बांधण्याबाबतचा हा प्रस्ताव असून, शिरोळ पंचायत समिती बांधकाम विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे.
गेल्या वर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना फटका बसला होता. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्यापासून तालुका पातळीवरील प्रशासनाकडून यंत्रणा कार्यरत असते. पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्राची सोय केली जाते. पूरग्रस्तांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी निवारा केंद्रात राहण्याची सोय होते. सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येतात. महापूर काळात निवारा केंद्रावर असणाऱ्या अपुऱ्या शौचालयांमुळे गैरसोय होत असल्याची बाब मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीच्या निमित्ताने पुढे आली होती.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निवारा केंद्राच्या माहितीबरोबरच किती शाळांमध्ये पूरग्रस्त राहण्यासाठी असतात, याचा आढावा घेतला. या वेळी पंचायत समिती शिक्षण विभागाने त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर ज्या शाळांमध्ये आपत्ती काळात पूरग्रस्तांच्या वास्तव्याची सोय होते, अशा शाळांमध्ये किती शौचालयांची गरज आहे, याबाबतचा प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर शिरोळ पंचायत समितीने याबाबतचा प्रस्ताव तयार केला. जवळपास २५ शाळांमध्ये २०४ शौचालयांची आवश्यकता असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पंचायत समिती बांधकाम विभागाकडून हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02860 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..