जखमी जवनव्ह मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जखमी जवनव्ह मृत्यू
जखमी जवनव्ह मृत्यू

जखमी जवनव्ह मृत्यू

sakal_logo
By

३४९०

अपघातात जखमी
जवानाचा मृत्यू
जयसिंगपूर, ता. ९ : अपघातात जखमी जवानाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दिगंबर कृष्णाजी चव्हाण (वय २५ रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी (ता. ७) जयसिंगपूर-शिरोळ मार्गावर अपघातात ते जखमी झाले होते. सैनिक टाकळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. श्री. चव्हाण पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. त्यांच्या वडिलांवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना पाहून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला होता. सांगली येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. बेळगाव येथील आर्मी पथकाकडून मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यविधी केला. महसूलचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या मागे आई, वडील, तीन बहिणी, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jsp22b02876 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top